बातमी ऐका (Marathi Voice Reader)
Crime News : कानपूरचे प्रसिद्ध उद्योगपती विनीत मनोचा यांचे दोन आठवड्यांपूर्वी सूनेने घरातल्याच नोकरांच्या मदतीने सासऱ्याचा खुन केला होता.या घटनेचा तपास करताना सुनबाईच मास्टरमाईंड असल्याचे समोर आले होते.त्यानंतर पोलिसांच्या तपासात वेगवेगळे पैलू समोर आले होते. हे पैलू समोर येत असताना उद्योगपती विनीत यांचा मुलगा सुब्रत याची देखील पोलिसांनी चौकशी सुरु केली होती. या चौकशीत त्याला बापाला मारल्याच दुःख नव्हतं.तर त्याला भलत्याच गोष्टीच दु:ख होतं. त्यामुळे त्याने पोलीस चौकशीत काय सांगितलं आहे? हे जाणून घेऊयात.
विनीत मनोचा यांचा मुलगा सुब्रतने पोलिसांना सांगितले की, वडिलांच्या हत्येच मला दु:ख नाही आहे. दु:ख या गोष्टीच आहे की त्यांची चाकूने भोसकून हत्या का केली.तसेच पुढे सुब्रतने त्याच्या वडिलांच्या वागणुकीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
पोलिसांच्या समोर सुब्रत हत्येची कबुली देत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत आरोपी हत्येची प्लानिंग आणि नोकर विशालला या गुन्ह्यात सामावून घ्यायचं आणि घटनाक्रम सांगताना दिसला आहे.तसेच चौकशी दरम्यान त्याने वडिलांच्या हत्येची प्लानिंग चार पाच महिन्यापूर्वी केल्याचेही सांगितले. यामागचं कारण सांगताना तो म्हणाला, वडिलांचे इतर महिलांसोबत संबंध होते. या संबंधामुळे कुटुंब तणावात होतं, तसेच कुटुंबियांची संपत्ती इतर कुणाच्या नावावर जाण्याचीही भीती होती.
कानपूरचे पोलिस कमिश्नर रघुवीर लाल यांनी आजतकशी बोलताना सांगितले. ही अचानक घडलेली घटना नाही आहे, याउलट शांत डोक्याने रचलेला प्लान आहे.आरोपीने जानूनबुझून शालूकडून गार्डला फोन करायवा लावला आणि हत्येसाठी वापरता आलेल्य फोनवरून देखील शालूच्या वतीने कॉल करायला लावला.
तीन ते चार महिन्यांपूर्वीच आपल्या वडिलांच्या हत्येचा कट रचला होता. त्याने या हत्येच्या प्लानबद्दल आपला नोकर विशाल यालाही सांगितले होते, असे म्हटले जाते. सुब्रताचा दावा आहे की, त्याने विशालला त्याचे कर्ज फेडण्यासाठी सुमारे दीड ते दोन लाख रुपये देणार असल्याचे सांगितले होते. व्हिडिओमध्ये, आरोपी स्पष्ट करतो की, त्याचा नोकर विशालने रस्त्यावर अपघात घडवून आणण्यासह हत्येच्या अनेक पद्धती सुचवल्या होत्या. मात्र, सुब्रता म्हणतो की, असे कृत्य अंगलट येऊ शकते असे त्याला वाटले. त्यानंतर त्या दोघांनी मिळून ही हत्या आजारपण किंवा नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवून संशय टाळण्याची योजना आखली.
पोलिसांच्या चौकशीदरम्यान सुब्रताने उघड केले की त्याच्या वडिलांच्या अनेक महिलांसोबतच्या संबंधांमुळे कुटुंबात बऱ्याच काळापासून तणाव होता. त्याने आरोप केला की, वडिलांच्या वागणुकीमुळे त्याची आई खूप व्यथित झाली होती आणि याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होत होता.
सुब्रताने विशालला घराच्या चाव्या दिल्या होत्या. ही चावी त्याच्या गाडीत ठेवली होती. तो म्हणतो की विशालने या चावीचा वापर करून डुप्लिकेट चावी बनवली आणि नंतर मूळ चावी परत केली. त्याने विशालला घरात कसे प्रवेश करायचे हे देखील सांगितले होते. तो म्हणतो की, जेव्हा तो निघून जाईल, तेव्हा विशालने त्याच्या खोलीत येऊन रात्रीच्या जेवणानंतर वडील झोपी जाण्याची वाट पाहावी. यानंतर खून करण्याची योजना होती. सुब्रताने विशालला घरातील परिस्थिती आणि कुटुंबातील सदस्यांच्या येण्या-जाण्याबद्दल माहिती दिली होती, जेणेकरून गुन्ह्याच्या वेळी दुसरे कोणीही उपस्थित राहणार नाही.
सुब्रताने अंदाजे 40 लाख रुपयांचे कर्ज असल्याचेही कबूल केले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, विविध कर्जांमुळे त्याला दरमहा अंदाजे 55 ते 56 हजार रुपयांचे हप्ते भरावे लागत होते. पैसे कुठून आले असे विचारल्यावर, त्याने कर्ज घेतल्याचे आणि क्रेडिट कार्ड वापरल्याचे सांगितले. सुब्रतोला त्याचे वडील पैसे असताना देखील द्यायचे नाही त्यामुळेच तो या कटात सहभागी झाला होता.