ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच!

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोलापूर : सासऱ्याने दिलेली एक भेट माणसाचे भाग्य कसे बदलू शकते, याचे अत्यंत दुर्मिळ आणि प्रेरणादायी उदाहरण पंढरपूर तालुक्यातील आष्टी गावात पाहायला मिळत आहे. सासरकडून मिळालेल्या अवघ्या एका शेळीच्या जिवावर जावयाने चक्क 40 शेळ्यांचा कळप तयार करत बंदिस्त शेळीपालनाचा यशस्वी व्यवसाय उभारला आहे. सिद्धेश्वर दशरथ सुळे असे या जिद्दी जावयाचे नाव असून, ते या व्यवसायातून दर सहा ते सात महिन्याला दोन ते तीन लाख रुपयांचा निव्वळ नफा कमवत आहेत. या संदर्भात अधिक माहिती सिद्धेश्वर सुळे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.

काही वर्षांपूर्वी सिद्धेश्वर सुळे यांच्याकडे जर्सी गाय होती. मात्र, पुरेसे उत्पन्न मिळत नव्हते आणि स्वतःची शेती नसल्याने जर्सी जनावरांसाठी चारा कुठून आणायचा, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. जावयाची ही अडचण पाहून त्यांच्या सासऱ्यांनी घरच्या घरी वापरासाठी सुरुवातीला एक गावरान शेळी भेट म्हणून दिली. सासऱ्याने दाखवलेल्या या विश्वासाचे जावयाने सोन्यात रूपांतर करायचे ठरवले. त्यांनी जर्सी गाय विकून पूर्ण लक्ष शेळीपालनावर केंद्रित केले.

गेल्या पाच वर्षांत सिद्धेश्वर यांनी अहोरात्र मेहनत घेऊन एका शेळीपासून 40 पेक्षा अधिक शेळ्या आणि बोकडांची पैदास आणि विक्री केली आहे. सध्या त्यांच्याकडे 35 हून अधिक शेळ्या आहेत. ते दर सहा-सात महिन्यांनी शेळ्या आणि बोकडांची विक्री करतात. बाजारात एका शेळीला 5 ते 7 हजार रुपये, तर बोकडाला 8 ते 27 हजार रुपयांपर्यंत चांगला भाव मिळतो. सासऱ्याच्या एका छोट्या मदतीने जावयाला आज आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे.

शारीरिक त्रास आणि व्यवसाय खर्च कमी करायचा असेल, तर शेतकऱ्यांनी शेती किंवा इतर कामासोबत जोडव्यवसाय म्हणून शेळीपालन नक्की करावे, असा सल्ला सिद्धेश्वर सुळे देतात. सासरे आणि जावयाच्या या अनोख्या नात्याची आणि त्यांनी साध्य केलेल्या यशाची चर्चा आज संपूर्ण परिसरात रंगत आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर