ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश ठरला?:काँग्रेसला तगडा झटका; आमदार प्रज्ञा ह्या राहुल गांधींचे निकटवर्तीय राहिलेले दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील. प्रज्ञा सातव ह्या काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. त्या सध्या विधानपरिषदेच्या सदस्या आहेत. त्यामुळे भाजपने त्यांना आपल्या पक्षात घेणे निश्चित केले असेल तर तो काँग्रेससाठी एक जबर झटका ठरेल. यासंबंधीच्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यात मोठी राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. काँग्रेसचा एक बडा नेता भाजपाच्या गळाला लागला आहे. पुढील काही दिवसांतच त्या नेत्यासह कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यासाठी संबंधित नेत्याने त्यांच्या मोजक्याच कार्यकर्त्यांना तातडीने मुंबईत पोहोचण्याचा संदेश दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. हा बडा नेता म्हणजे आमदार प्रज्ञा सातव असल्याचे सांगण्यात येत आहे. दिव्य मराठीने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. गत 4 महिन्यांत हिंगोलीत मोठी उलथापालथ उल्लेखनीय बाब म्हणजे हिंगोली जिल्ह्यात मागील 4 महिन्यांत मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या आहेत. काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिंदेसेनेला सेनगाव व हिंगोली तालु्क्यात मोठे बळ मिळाले. त्यानंतर पालिका निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) काही माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. या शिवाय शरद पवार गटाचेच जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह माजी नगरसेवकांनीही नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हिंगोलीहून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना त्यानंतर आता हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसचा एक चेहरा भाजपाच्या गळाला लागला आहे. त्यासाठी मुंबईत राजकीय हालचाली सुरु झाल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपमध्ये जाणाऱ्या या नेत्याने त्यांच्या काही निवडक कार्यकर्त्यांना मुंबईत पोहोचण्याचे संदेश पाठविले आहेत. त्यानुसार काँग्रेसचे काही कार्यकर्ते बुधवारी ता. 17 मुंबईकडे रवाना झाले आहेत. आता या कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच नेत्याचा भाजपा प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. पुढील काही दिवसांतच पक्षप्रवेश मुंबईकडे रवाना झालेल्या काही कार्यकर्त्यांनी आपल्याला नेत्याने मुंबईत बोलावल्याचे स्पष्ट केले. पण त्यांचा भाजपा प्रवेश आहे किंवा नाही याची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तूर्तास या पक्ष प्रवेशाबाबत कमालीची गोपनीयता बाळगली जात आहे. पण पुढील काही दिवसांतच हा पक्ष प्रवेश होईल अशीही खात्रीलायक माहिती आहे. या चर्चेमुळे आता राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. कोण आहेत प्रज्ञा सातव? डॉक्टर प्रज्ञा सातव या काँग्रेस दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव 2014 ते 2019 या कालावधीत हिंगोलीचे खासदार होते. गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे म्हणून त्यांची ख्याती होती. पण 2021 मध्ये आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. त्यानंतर प्रज्ञा सातव राजकारणात आल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. सध्या त्या महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षा म्हणून काम करत आहेत. तत्पूर्वी, 2021 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीतही त्या विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून दुसऱ्यांदा त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली. त्यांचा कार्यकाळ 2030 मध्ये संपणार आहे. कोण होते राजीव सातव? राजीव सातव राहुल गांधी यांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. 2014 च्या मोदी लाटेत महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे केवळ 2 खासदार निवडून आले होते. त्यामध्ये राजीव सातव यांचा समावेश होता. त्यामुळे राजीव सातव प्रचंड चर्चेत आले होते. त्यानंतर राजीव सातव यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्तुळात स्वत:चे स्थान निर्माण केले होते. राजीव सातव यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य म्हणून काम केले. तर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी आणि काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या आणि पदे भूषवली होती. प्रज्ञाताई असे पाऊल उचलतील असे वाटत नाही – सतेज पाटील दुसरीकडे, काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी प्रज्ञाताई काँग्रेस सोडतील असे आपल्याला वाटत नसल्याचे म्हटले आहे. प्रज्ञा सातव यांना काँग्रेसने आमदारकी दिली. त्यामुळे त्या असे पाऊल उचलतील असे वाटत नाही. ही बातमी निराधार आहेत असे मला वाटते. पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या संपर्कात राहू, असे ते म्हणालेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर