ब्रेकिंग न्यूज
महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना…
SP News Maregaon

महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव तालुका कृषी विभागाचे पात्र महिलांना आवाहन; योजनांचा लाभ घेणे होणार सुलभ

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव : शेती आणि शेतीपूरक व्यवसायात प्रत्यक्ष योगदान देणाऱ्या महिलांना अधिकृत ओळख मिळावी तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेणे सुलभ व्हावे, यासाठी महिला शेतकरी प्रमाणपत्राची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तालुक्यातील पात्र महिला शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेऊन तातडीने नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दिपाली खवले यांनी केले आहे.

महिला शेतकरी प्रमाणपत्रामुळे शेती किंवा शेतीशी संबंधित विविध कामांमध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या महिलेला अधिकृत महिला शेतकरी म्हणून ओळख मिळणार आहे. विशेष म्हणजे, महिलेच्या नावावर जमीन असणे हाच महिला शेतकरी होण्यासाठी एकमेव निकष नसून, शेती व शेतीपूरक कृषी कार्यातील प्रत्यक्ष सहभागालाही महत्त्व देण्यात आले आहे.

विविध कृषी उपक्रमांतील महिलांचा समावेश
पीक उत्पादन व लागवड, बीजोत्पादन, फुलशेती, भाजीपाला उत्पादन, फलोत्पादन, पशुपालन व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालन, मधमाशीपालन, मत्स्य व्यवसाय, रेशीम उत्पादन, गांडूळखत व कंपोस्ट निर्मिती, अळंबी उत्पादन, कृषिमाल प्रक्रिया व मूल्यवर्धन यांसह विविध शेतीपूरक व्यवसायांत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या महिलांना या नोंदणीचा लाभ घेता येणार आहे.
योजना, कर्ज व प्रशिक्षणासाठी ठरणार उपयुक्त
महिला शेतकरी म्हणून अधिकृत नोंदणी झाल्यानंतर कृषी विभागाच्या विविध योजना व सुविधांमध्ये महिलांची ओळख सुलभ होण्यास मदत होणार आहे. कृषी कर्ज, पीक विमा, कृषी निविष्ठा, प्रशिक्षण, कृषी विस्तार सेवा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी हे प्रमाणपत्र उपयुक्त ठरू शकते. मात्र, संबंधित योजनांसाठी स्वतंत्र पात्रता व नियम लागू राहणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
अशी करा ऑनलाइन नोंदणी
महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी कृषी विभागाच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्ज करताना ‘Apply Now’ हा पर्याय निवडून आधार क्रमांक व ओटीपीद्वारे पडताळणी करावी. त्यानंतर जिल्हा, तालुका, गाव, मोबाइल क्रमांक, कृषी कार्याचा प्रकार आदी आवश्यक माहिती भरावी.
उपलब्ध असल्यास कुटुंबातील सदस्याचा Farmer ID जोडून आवश्यक पडताळणी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे मारेगाव तालुक्यातील शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या सर्व पात्र महिलांनी महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन तालुका कृषी विभागाने केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर