ब्रेकिंग न्यूज
⚡ Pune News: फटाक्यांवरून मध्यरात्री पुण्यात राडा, वडिलांना वाचवायला गेलेल्या लेकीसोबतच भयंकर घडलं, क्षणात रक… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ कटिंग चहा देखील महाग होणार! मदर डेअरीपाठोपाठ 2 कंपन्यांनी वाढवले दुधाचे दर, नवे दर आजपासून लागू ✦ ⚡ Cricket Rule : ना कॅच, ना रन आऊट, ना बोल्ड… अंपायरने भलत्याच कारणासाठी दिलं आऊट, क्रिकेटमधली सगळ्यात विचि… ✦ ⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह… ✦ ⚡ CRIME : आईने पोटच्या 24 वर्षाच्या पोराला संपवलं, कोल्ड ड्रिंकमधून झोपेच्या गोळ्या दिल्या अन्… एका गोष्टीस… ✦ ⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात…
SP News Maregaon

रोहित पवारांचे प्रसिद्धीसाठी माझ्यावर आरोप:अजितदादांच्या अपघातानंतर काय घडले ते सांगायला लावू नका, सुनील तटकरेंचा इशारा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर पलटवार करताना मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे. “अजितदादांच्या अपघातानंतर हॉस्पिटलमध्ये काय घडलं, तिथपासून ते पोस्टमॉर्टमपर्यंतची इत्यंभूत माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे मर्यादा ओलांडू नका, अन्यथा मला तोंड उघडावे लागेल,” असा खळबळजनक इशारा तटकरे यांनी दिला आहे. रोहित पवारांनी केलेल्या आरोपांनंतर तटकरे यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी नुकताच एक खळबळजनक दावा केला होता की, “खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांना दिवंगत नेते अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष स्वतःच्या ताब्यात घ्यायचा होता.” या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. या आरोपांवर सुनील तटकरे यांनी आज आपली भूमिका स्पष्ट करत रोहित पवारांवर पलटवार केला. आम्ही अजितदादांची सावली बनून साथ दिली रोहित पवारांच्या आरोपांना उत्तर देताना तटकरे म्हणाले, “माझ्यावर टीका होणे ही काही नवीन गोष्ट नाही. २०१४ सालापासून मला सातत्याने टार्गेट केले जात आहे. मात्र, मी कायम अजितदादांसोबत होतो. एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय असो किंवा पक्षाची पुढील रणनीती, आम्ही सावलीसारखे त्यांच्या पाठीशी उभे होतो. अजितदादांनी राज्याच्या राजकारणात मिळवलेली पकड आणि त्यांची उंचावलेली प्रतिमा यात आमचाही खारीचा वाटा होता. रोहित पवार प्रसिद्धीसाठी मला टार्गेट करत आहेत.” गुपितांचा स्फोट करण्याचा इशारा सुनील तटकरे यांनी यावेळी रोहित पवारांचे नाव न घेता त्यांना ‘शांत’ राहण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “अजित पवार यांचा अपघात झाल्यानंतर त्यांचे पार्थिव हॉस्पिटलला आणल्यापासून ते पोस्टमॉर्टमपर्यंत नेमके काय काय घडले, याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे कृपया थांबा, अन्यथा भविष्यात मला अनेक गोष्टी जाहीर कराव्या लागतील.” या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, तटकरे नेमक्या कोणत्या ‘गुपितां’बद्दल बोलत आहेत, याची चर्चा सुरू झाली आहे. पवार कुटुंबियांविरोधातील ‘कटकारस्थाना’चा दावा सुनील तटकरे यांनी केवळ पक्षावरच नाही, तर पवार कुटुंबातील सदस्यांविरुद्ध सुरू असलेल्या हालचालींवरही भाष्य केले. “सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांच्या विरोधात तुम्ही काय कटकारस्थान रचत होता, याची माहिती आमच्या सर्वांकडे आहे. आपल्याला सुसंस्कृत पद्धतीने राजकारण करायचे आहे, त्यामुळे ज्याला हा इशारा आहे त्याने तो समजून घ्यावा आणि वेळीच थांबावे,” असेही तटकरे यांनी निक्षून सांगितले. राजकीय संघर्षाला नवे वळण रोहित पवार विरुद्ध सुनील तटकरे असा हा सामना आता केवळ राजकीय तत्त्वांपुरता मर्यादित न राहता, वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांच्या पातळीवर उतरला आहे. सुनील तटकरे यांनी दिलेल्या या सूचक इशाऱ्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर