ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई: आज अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनासाठी मुंबईत मोठ्या मिरवणुका निघतात. बाप्पाला निरोप देण्यासाठी लाखो मुंबईकर बाहेर पडतात. त्यामुळे मुंबईची जीवनवाहिनी लोकल सेवेवर ताण येतो. याच पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या गर्दीचे विभाजन करण्यासाठी लोकल सेवेच्या नियोजनात मोठे बदल केले आहेत.

गणेश विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच 25 सप्टेंबर रोजी 84 लोकल फेऱ्यांचा पूर्वनियोजित चर्नी रोड थांबा रद्द करण्यात आला आहे. तर 37 जलद लोकल सर्व स्थानकांवर थांबवण्यात आल्या आहेत. तसेच रात्री उशिरा प्रवास करणाऱ्यांसाठी 12 धीम्या फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गणपती विसर्जनासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.

Weather Alert: विजा कडाडणार, वारे वाहणार, बाप्पांच्या निरोपाला धो धो पाऊस, 21 जिल्ह्यांना अलर्ट

विरार ते चर्चगेट विशेष फेऱ्या

अनंत चतुर्दशीला बाप्पांच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांची मोठी गर्दी होते. आज देखील लाखोंच्या संख्येनं भाविक या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे. विसर्जनाच्या रात्री उशिरा घरी जाणाऱ्या भाविकांसाठी चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेट दरम्यान प्रत्येकी सहा लोकल फेऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे.

चर्नी रोड थांबा रद्द

गणेश विसर्जनाच्या दिवशी सायंकाळी 6 ते रात्री 11.30 या कालावधीत चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या 84 अप धीम्या लोकल चर्नी रोड स्थानकाच्या फलाट क्रमांक 2 वर थांबणार नाहीत. फलाट क्रमांक 2 आणि 3 वर होणारी संभाव्य गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे सायंकाळी 5 ते रात्री 8.30 या काळात मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्यान धावणाऱ्या 37 जलद 12 डब्यांच्या लोकल धीम्या लोकलप्रमाणे धावतील. या सर्व लोकलना चर्नी रोडसह सर्व स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

15 डब्यांच्या लोकलबाबत निर्णय

एकीकडे 12 डब्यांच्या लोकलला चर्नी रोडसह सर्व थांबे देण्यात आले आहेत. मात्र, 15 डब्यांच्या लोकलना ग्रँड रोड, चर्नी रोड आणि मरिन लाईन्स स्थानकांवर थांबा नसेल. विसर्जन मिरवणुकीत होणारी गर्दी विचारात घेऊन गर्दी विभाजनासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

विशेष लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक

चर्चगेट ते विरार: मध्यरात्री 1.15, 1.45, 2.15, 2.55, 3.15 आणि 3.45 वाजता अशा

विरार ते चर्चगेट: मध्यरात्री 12.15, 12.30, 1.10, 1.30, 2 आणि 3 वाजता एकूण 6 फेऱ्या.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर