ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर अशी भाजपची भूमिका:MIM शी युती करताना हिरवे झाले नाहीत का? संजय राऊतांची बोचरी टीका

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्रात अर्धी काँग्रेस भाजपात सहभागी करुन घेतली. उर्वरित ठिकाणी एमआयएम बरोबर युती केली. भाजपला कोणीही चालते. महाराष्ट्रभर भाजप-एमआयएमची छुपी युती आहे. जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर चढायला भाजप तयार आहे. अशी टीका राऊत यांनी केली. तसेच एमआयएमशी युती करताना ते आता हिरवे झाले नाहीत का? असा बोचरा सवालही राऊत यांनी भाजपला केला आहे. मिराभाईंदर आणि अकोटमध्ये भाजपने एमआयएमसोबत युती केली आहे. तर अंबरनाथ नगरपरिषदमध्ये काँग्रससोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. यावरून संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जिव्हारी लागणाऱ्या शब्दांत टीका केली आहे. तसेच अजित पवार सावरकरांना मानत नाहीत, तर मग त्यांना सरकारमध्ये कशाला ठेवता? त्यांना सरकारमधून दूर करा, असे आव्हानही संजय राऊत यांनी भाजपला दिले. “आता भाजप ‘हिरवी’ झाली नाही का?” – युतीवरून निशाणा अंबरनाथ आणि मिरा-भाईंदरमधील राजकीय घडामोडींचा दाखला देत राऊत यांनी भाजपच्या ‘हिंदुत्वा’वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “मिरा-भाईंदरमध्ये भाजपने एमआयएमला (MIM) पाठिंबा दिला आहे, तर अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि भाजप एकत्र आले आहेत. आता हे हिरवे झाले नाहीत का? अकोटपासून मिरा-भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत उघड-गुप्त युती सुरू आहे. भाजप कामाठीपुऱ्यामध्ये उभी आहे. कोणीही या अशी स्थिती झालीये. हा निर्लज्जपणाचा कळस असून भाजप हे ‘दुतोंडी गांडूळ’ आहे. जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर चढायला भाजप तयार आहे,” अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली. मराठी माणसाचे ‘डेथ वॉरंट’ मराठी माणसाच्याच हाती? संजय राऊत यांनी भाजपच्या रणनीतीवर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, “भाजपने निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था आणि प्रशासनात जे अधिकारी नेमले आहेत, ते मराठीच आहेत. विशेष म्हणजे, मराठी माणसाच्या हातूनच मराठी माणसाचे ‘डेथ वॉरंट’ काढले जात आहे, ही भाजपची मोठी कसब आहे.” प्रशासनाचा खेळखंडोबा राज्यातील सध्याच्या स्थितीवर भाष्य करताना राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सध्या राज्याचा कारभार वाऱ्यावर सोडून प्रचारासाठी राज्यभर फिरत आहेत. दुसरीकडे अजित पवार भाजपला शिव्या घालत आहेत आणि तरीही सत्तेत एकत्र आहेत, हा प्रकार संतापजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. ठाकरे बंधुंची संयुक्त मुलाखत महाराष्ट्राची शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील युतीनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पहिल्यावहिल्या संयुक्त मुलाखतीचा टीझर समोर आला. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ऐतिहासिक मुलाखत घडताना कशी दिसतीये ते आपण काल पाहिले. प्रथम संयुक्त मुलाखतीला सर्व पत्रकारांना बसवले होते. मुलाखत देणारे आणि मुलाखत घेणारे दोन धुरंदर एकत्र आले. महाराष्ट्राच्या दृष्टीने तिला आम्ही महाराष्ट्राची मुलाखत म्हटले आहे. महाराष्ट्राला जे प्रश्न पडलेत आणि महाराष्ट्रासंदर्भात ज्या समस्या आहेत, त्या सर्व विषयांवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपली मते व्यक्त केली. मुंबई आपल्या हातची गेली, तर आपल्या पुढील पिढ्या बरबाद होतील. आता नाही, तर कधीच नाही, असे ठाकरे बंधुंनी सांगितल्याचे संजय राऊत म्हणालेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर