ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

साहित्य संमेलनात चार दिवसांत 9 कोटींच्या पुस्तकांची विक्री:राज्यभरातील 150 साहित्यिक, 550 कवींना मिळाले हक्काचे व्यासपीठ

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सातारा येथे झालेल्या शतकपूर्व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात चार दिवसात साताऱ्यासह अन्य राज्यातून १० लाख साहित्यप्रेमींनी उपस्थिती दाखविली. परिसंवाद, चर्चा आदी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या व्यासपीठावरून १५० साहित्यीकांना तर कवी कट्टा व मुख्य व्यासपीठावर ५५० कवींना व्यासपीठ मिळाले. मोठे आकर्षण असलेल्या पुरस्तक प्रदर्शनासाठी पहिल्यांदाच ४० कोटीचा विमा उतरविला गेला. आठ कोटी ७२ लाखांची पुस्तकविक्री झाल्याची माहिती महामंडळाने दिली. पुस्तक खरेदासाठी येणाऱ्या साहित्यरसिकांचा २५ कोटींचा तर फर्निचर आणि इतर साहित्याचा चार कोटी ३० लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला होता. संमेलनाच्या मुख्य मंडपात जाण्याचा मार्ग ग्रंथ दालनातूनच ठेवण्यात आल्यामुळे संमेलनास येणारा प्रत्येकजण ग्रंथ दालनातूनच जात-येत होता. त्यामुळे पुस्तक विक्रिला प्रतिसाद मिळाल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. आठ कोटी ७२ लाखांची पुस्तक विक्री झाल्याची माहिती महामंडळाच्या कार्यवाह सुनिताराजे पवार यांनी दिली. मुख्य मंडपासह परिसंवाद-परिचर्चेसाठी उभारलेला दुसरा मंडप तसेच बाल-कुमार वाचककट्टा, गझल-कवी कट्टा, पुस्तक प्रकाशन मंच येथे चारही दिवस उपक्रमाला प्रतिसाद मिळाला. १५० साहित्यिक व्यासपीठावरून भूमिका मांडू शकले. विविध विषयांच्या ३ लाख पुस्तकांचा समावेश पुस्तक प्रदर्शनात समिक्षा, ऐतिहासिक, वैचारिक, धार्मिक, बालसाहित्य अशा सर्वच प्रकारच्या पुस्तकांची विक्री या पुस्तक प्रदर्शनात झाली. यावर्षी साधारण ३ लाख पुस्तकांची विक्री झाली असून किमान ५०० रुपयेपासून ते ५० रुपये किंमतीची पुस्तकांची सरासरी किंमत काढली तरी जवळपास ९ कोटींची पुस्तक विक्री झाली आहे, अशी माहिती महामंडळाच्या कार्यवाह सुनीताराजे पवार यांनी दिली. विद्यार्थी, साहित्य रसिकांचा मोठा प्रतिसाद- विनोद कुलकर्णी, (कार्याध्यक्ष, साहित्य महामंडळ) सातारा नगरीला जशी ऐतिहासिक परंपरा आहे, त्याप्रमाणे सातारा शहर आणि जिल्ह्यात साहित्यप्रेमी, वाचक मोठ्या संख्येने आहेत. शतकपूर्व संमेलन साहित्य प्रेमींच्या सहभागातून व्हावे यासाठी जे सुरुवातीपासून प्रयत्न सुरू होते ते विद्यार्थी, साहित्य रसिकांचा मिळालेला प्रतिसाद बघता यशस्वी ठरले आहेत. सातारा येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनात पुस्तक खरेदीसाठी अशी गर्दी झाली होती.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर