ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

महापालिका निवडणुकांसाठी हिंगोली पोलिस दल सज्ज:कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची मोठी कुमक तैनात, 200 कर्मचारी बंदोबस्तासाठी रवाना

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महानगर पालिका निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हिंगोली जिल्हा पोलिस दलातील 200 पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून लवकरच हे कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी रवाना होणार आहेत. राज्यात 29 महानगर पालिकांच्या निवडणुका होत असून यामध्ये कोकण, नाशीक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, अमरावती, नागपूर विभागातील महानगर पालिकांचा समावेश आहे. या निवडणुकीत मतदान प्रक्रिया शांतेत पार पडावी तसेच कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयातून पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. या पोलिस बंदोबस्तासोबतच राज्य राखीव दलाचे जवान देखील तैनात केले जाणार आहेत. या महानगर पालिकांसाठी गुरुवारी ता. 15 रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून शुक्रवारी ता. 16 रोजी मतमोजणी होणार आहे. या पालिका निवडणुकीत मतदान कालावधीत तसेच मतमोजणीच्या वेळी कुठेही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिस विभाग सतर्क झाला आहे. त्यासाठी स्थानिक पोलिस दला सोबतच इतर जिल्हयातील पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी बोलावण्यात आले आहेत. त्यानुसार हिंगोली जिल्हयातील 200 पोलिस कर्मचारी पाठविले जाणार आहेत. यामधे जिल्हयातील सर्वच पोलिस ठाण्यांतर्गत काही कर्मचारी बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यानुसार पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्तासाठी नियुक्त कर्मचारी रवाना केले जाणार आहेत. यामध्ये 80 पोलिस कर्मचारी मुंबई येथे पाठविले जाणार असून 20 पोलिस कर्मचारी छत्रपती संभाजीनगर येथे तर 100 पोलिस कर्मचारी नाशीक येथे पाठविले जाणार आहेत. शनिवारपर्यंत ता. 17 रोजी हे कर्मचारी त्यांना नेमुन दिलेल्या ठिकाणावर बंदोबस्तासाठी राहणार आहेत. त्यानंतर संबंधित जिल्हयांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच या कर्मचाऱ्यांची हिंगोलीत पुन्हा रवानागी होणार असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर