ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

री-नीट: 5 विद्यार्थ्यांसह 24 जणांना अटक:बिहारमध्ये 40 लाख घेऊन डमी विद्यार्थी परीक्षेला बसले, फिंगरप्रिंट घेणाऱ्या बायोमेट्रिक कंपनीचे 14 कर्मचारीही सामील

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


३ मे रोजी पेपरफुटीनंतर रविवारी नीट-युजी २०२६ ची पुन्हा परीक्षा झाली. यादरम्यान बिहारमध्ये एका मोठ्या सॉल्वर गँगचा पर्दाफाश झाला. खऱ्या परीक्षार्थीच्या जागी बसण्यास वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांनी ३०-४० लाखांत डील ठरवली होती. पोलिसांनी या प्रकरणात गँगच्या म्होरक्यासह पीएमसीएच, गयाजी मेडिकल कॉलेज, एम्स रायबरेली व बीएचयूच्या ५ मेडिकल विद्यार्थ्यांसह एकूण २४ जणांना अटक केली. यात परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांचे फिंगरप्रिंट घेणाऱ्या बायोमेट्रिक कंपनीच्या १४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलिसांना डमी उमेदवार परीक्षा देत असल्याचे कळले होते. त्यामुळे त्यांनी राजकीय उच्च विद्यालय हसनपूर, केआरके हायर सेकंडरी व केंद्रीय विद्यालयात छापे टाकून या आरोपींना पकडले. लखीसरायच्या एसपी प्रेरणा यांच्या मते, आरोपींकडून मोबाइल आणि इतर महत्त्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. हाजीपूरचा मूळ रहिवासी मयंक कश्यप पीएमसीएचचा विद्यार्थी आहे. एनटीएने बायोमेट्रिक तपासणीची जबाबदारी ज्या खासगी कंपनीला दिली होती, मयंकने त्याच कंपनी कर्मचाऱ्यांशी संगनमत केले. त्यानंतर तो स्वतः कर्मचारी बनून हसनपूर परीक्षा केंद्रात घुसला. मात्र, पोलिसांनी त्याला पकडले. मयंकच्या कसून चौकशीनंतर बायोमेट्रिक कंपनीचे इतर कर्मचारीही पकडले गेले व हा मोठा पर्दाफाश झाला. राजस्थानात… अंतर्वस्त्रांमध्ये मोबाईल घेऊन गेली, परीक्षा संपण्याच्या १५ मिनिटे आधी पकडली गेली दिव्य मराठी नेटवर्क. जयपूर | राजस्थानमध्ये एक विद्यार्थिनी सर्व सुरक्षा तपासणीला चकवा देत मोबाईल घेऊन परीक्षा हॉलमध्ये पोहोचली. परीक्षा संपण्याच्या १५ मिनिटे आधी फोटो काढताना ती पकडली गेली. ही घटना बिन्दायका येथील राजकीय सीनियर सेकंडरी स्कूलमधील आहे. मोबाईलमध्ये पेपरचे फोटो मिळाले आहेत. जॅमरमुळे ती पेपर बाहेर पाठवू शकली नाही. विद्यार्थिनीने चौकशीत सांगितले की, एआयवरून उत्तरे शोधण्यासाठी मोबाईल आणला होता. तिला अटक करण्यात आली आहे.
शेवटी कशी दिशाभूल केली? शाळेच्या प्रवेशद्वारापासून परीक्षा हॉलपर्यंत तपासणीदरम्यान दोनदा मेटल डिटेक्टरने अलर्ट दिला होता. विद्यार्थिनीने अशी दिशाभूल केली की अंतर्वस्त्रांच्या हुकमुळे अलर्ट येत आहे.
विद्यार्थिनी तिसऱ्यांदा नीट परीक्षा देत होती. दोष सिद्ध झाल्यास ५ वर्षांची कैद; ‘द पब्लिक एक्झामिनेशन ॲक्ट, २०२४’ अंतर्गत गुन्हा दाखल. जर विद्यार्थिनी दोषी आढळली तर ५ वर्षांपर्यंतची शिक्षा आणि १० लाखांपर्यंत दंडाची तरतूद आहे. फिजिक्सचा पेपर गेल्या वेळेपेक्षा खूप कठीण होता, बायोलॉजीने सावरले; कट-ऑफ घसरण्याची शक्यता… मोबाईलमध्ये पेपरचे फोटो; म्हणाली- AI वरून उत्तरांसाठी आणला री-नीटची ओव्हरऑल पातळी मध्यम राहिली. यावेळी पाठांतराऐवजी वैचारिक स्पष्टतेला महत्त्व दिले गेले…
तज्ज्ञांच्या मते, फिजिक्सचा पेपर सर्वात कठीण आणि लांबलचक होता, ज्यामुळे सरासरी स्कोअर १० ते २० गुणांनी घसरू शकतो. केमिस्ट्रीची पातळी सामान्य राहिली. यात इनऑर्गेनिकचे प्रश्न थेट एनसीईआरटीमधून होते. बायोलॉजीचा पेपर सोपा राहिला.
फिजिक्समुळे एकूण कट-ऑफमध्येही १०-१५ गुणांची घसरण शक्य.
पंतप्रधान ४५ मिनिटे विमानतळावर थांबले… दिल्ली विमानतळावर पंतप्रधान मोदी यांनी परीक्षार्थींना ट्रॅफिक जॅमपासून वाचवण्यासाठी ४५ मिनिटे वाट पाहिली. दुपारी २ वाजता परीक्षा सुरू झाल्यानंतरच ते आपल्या निवासस्थानाकडे रवाना झाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर