ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

2.38 कोटींच्या फसवणूक प्रकरणी दोन संचालक अटकेत:आर्थिक गुन्हे शाखेची हैद्राबाद विमानतळावर कारवाई

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


ठेवीदारांची २ कोटी ३८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ‘ट्रेडज इन्व्हेस्टमेंट प्रा. लि.’ कंपनीच्या दोन संचालकांना अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने ३० डिसेंबर रोजी हैद्राबाद विमानतळावर ही कारवाई केली. सचिन खडतरे (रा. करकंब, पंढरपूर, सोलापूर) आणि प्रसाद कुलकर्णी (वय ३६, रा. सारंग सोसायटी, नांदेडसिटी, पुणे) अशी अटक केलेल्या संचालकांची नावे आहेत. या प्रकरणी एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी खडतरे आणि कुलकर्णी यांनी ठेवीदारांना शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास दरमहा आठ टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवले होते. त्यांनी ठेवीदारांकडून २ कोटी ३८ लाख रुपये जमा केले. कंपनीच्या संकेतस्थळावर परतावा मिळाल्याचे भासविण्यात आले, मात्र प्रत्यक्षात ठेवीदारांना कोणताही परतावा मिळाला नाही. ठेवीदारांच्या तक्रारीनंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी परदेशात पसार होण्याची शक्यता असल्याने आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्याविरुद्ध ‘लूक आऊट नोटीस’ बजावली होती. ३० डिसेंबर रोजी सचिन खडतरे आणि प्रसाद कुलकर्णी हे शारजा येथून हैद्राबादला विमान प्रवास करत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने हैद्राबाद विमानतळावर सापळा रचून दोघांना अटक केली. अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त शुभदा संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, सहायक निरीक्षक चेतन मोरे, राजेश लांघी, विनोद चव्हाण आणि मुसळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. अटक केलेल्या आरोपींना पुण्यातील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर