Skip to content
ब्रेकिंग न्यूज:
हौसेला मोल नाही:कोल्हापूरच्या हौशी सासऱ्याने अधिक मासात जावयाला दिली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल; किंमत काय? | सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ‘हिरकणी’ अखेर सुरक्षित!:10 दिवसांच्या चिंतेनंतर वन विभागाला मोठा दिलासा, मात्र गळ्यातील ‘सॅटेलाइट पट्टा’ बेपत्ता | शेतकऱ्यांचे तीन दिवसांपासून नाल्यात ठिय्या आंदोलन:कंजारा येथे नाला सरळीकरण करण्याची मागणी, पावसामुळे होतेय ३०० एकर क्षेत्राचे नुकसान | पुण्यात धावत्या कारमध्ये महिलेवर बलात्कार:कोरेगाव पार्क परिसरात रविवारी मध्यरात्री घडली घटना; लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अत्याचार | मुंबई महापालिकेतील 79 नगरसेवकांच्या निवडीला आव्हान!:न्यायालयात याचिका दाखल, BMC वर मोठा परिणाम होण्याची शक्यता; काय आहे प्रकरण?
SP News Maregaon
मुंबई महापालिकेतील 79 नगरसेवकांच्या निवडीला आव्हान!:न्यायालयात याचिका दाखल, BMC वर मोठा परिणाम होण्याची शक्यता; काय आहे प्रकरण?

मुंबई महापालिकेतील 79 नगरसेवकांच्या निवडीला आव्हान!:न्यायालयात याचिका दाखल, BMC वर मोठा परिणाम होण्याची शक्यता; काय आहे प्रकरण?

2 hours पूर्वी · 1 min read

auto_awesomeथोडक्यात महत्त्वाचे

मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 संदर्भात एक मोठी माहिती समोर आली असून, थेट 79 नगरसेवकांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या निवडणूक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. यातील अनेक याचिका सध्या न्यायप्रविष्ट असून...

मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 संदर्भात एक मोठी माहिती समोर आली असून, थेट 79 नगरसेवकांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या निवडणूक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. यातील अनेक याचिका सध्या न्यायप्रविष्ट असून काही प्रकरणांवर सुनावणी देखील सुरू आहे. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधींच्या निवडीविरोधात आक्षेप घेतले गेल्यामुळे संपूर्ण मुंबई महापालिका निवडणूक प्रक्रियेवरच आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या संदर्भातील माहिती माहिती अधिकार कायद्यान्वये आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुंबई महानगरपालिकेच्या विधी खात्याकडून देण्यात आली आहे. गलगली यांनी निवडणुकीनंतर विविध प्रभागांमध्ये दाखल झालेल्या निवडणूक याचिकांची माहिती मागवली होती. आता या समोर आलेल्या माहितीनुसार, प्रभाग 119 ‘एस’ मधील मोहम्मद अन्वर अब्दुल्ला शेख यांनी शिवसेनेचे नगरसेवक राजेश सोनावळे आणि इतर उमेदवारांच्या विरोधात दाखल केलेली निवडणूक याचिका लघुन्यायालयाने फेटाळून लावली आहे. मात्र, उर्वरित अनेक प्रकरणांमध्ये अद्याप प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयात आव्हान देण्यात आलेल्या लोकप्रतिनिधींमध्ये विविध राजकीय पक्षांच्या आणि मुंबईतील ‘एच/पूर्व’, ‘के/पूर्व’, ‘एस’, ‘एम/पूर्व’, ‘एफ/उत्तर’, ‘आर/उत्तर’, ‘पी/दक्षिण’ व ‘जी/उत्तर’ या महत्त्वाच्या प्रभागांतील नगरसेवकांचा समावेश आहे. निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, मतमोजणीतील आक्षेप, उमेदवारी अर्जांबाबतचे वाद आणि निवडणूक नियमांचे उल्लंघन यांसारख्या विविध मुद्द्यांवरून या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. इतक्या मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधींच्या निवडीला आव्हान दिले गेल्यामुळे, आगामी काळातील न्यायालयीन निर्णयांचा महापालिकेच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असून संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष आता पुढील सुनावण्यांकडे लागले आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या आणि तब्बल 25 वर्षे ठाकरेंची एकहाती सत्ता अनुभवलेल्या मुंबई महानगरपालिकेत भाजप युतीने ठाकरेंची सत्ता उलथवून लावली असून, यात 89 जागा मिळवत भाजप मुंबईतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65, शिंदेंच्या शिवसेनेला 29, काँग्रेसला 24, एमआयएमला 8, मनसेला 6, राष्ट्रवादी (अजित पवार गट) 3, समाजवादी पार्टीला 2 आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाला 1 जागा मिळाली असून, भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची अधिकृत यादी पुढीलप्रमाणे आहे. नगरसेवकांची यादी: वॉर्ड 1 – रेखा यादव – (शिंदे शिवसेना)
वॉर्ड 2 – तेजस्वी घोसाळकर (भाजप)
वॉर्ड 3 – प्रकाश दरेकर (भाजप)
वॉर्ड 4 – मंगेश पांगारे (शिवसेना शिंदे)
वॉर्ड 5 – संजय घाडी – शिंदे शिवसेना
वॉर्ड 6 – दीक्षा हर्षदा कारकर – शिंदे शिवसेना
वॉर्ड 7 – गणेश खनकर भाजप
वॉर्ड 8 – योगिता पाटील भाजपा
वॉर्ड 9 – शिवानंद शेट्टी – (भाजप)
वॉर्ड 10 – जितेंद्र अंबालाल पटेल (भाजप)
वॉर्ड 11 – अदिती फुरुसंगे शिंदे शिवसेना
वॉर्ड 12 – सारिका झोरे (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 13 – राणी द्विवेदी भाजप
वॉर्ड 14 – सीमा शिंदे भाजप
वॉर्ड 15 – जिज्ञासा शाह भाजप
वॉर्ड 16 – श्वेता कोरगावकर भाजप
वॉर्ड 17 – शिल्पा सांगुरे भाजप
वॉर्ड 18 – संध्या जोशी शिदे शिवसेना
वॉर्ड 19 – दक्षता कवठणकर भाजप
वॉर्ड 20 – दीपक तावडे (भाजप)
वॉर्ड 21 – लिना पटेल देहरकर (भाजप)
वॉर्ड 22 – हिमांशु पारेख (भाजप)
वॉर्ड 23- शिवकुमार झा ( भाजप)
वॉर्ड 24- स्वाती संजय जयस्वाल ( भाजप)
वॉर्ड 25 – निशा परुळेकर (भाजप)
वॉर्ड 26 – धर्मेंद्र काळे (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 27 – निलम गुरव (भाजप)
वॉर्ड 28 – अंजता यादव कांग्रेस
वॉर्ड 29 – सचिन पाटील ठाकरे शिवसेना
वॉर्ड 30- धवल वोरा (भाजप)
वॉर्ड 31 – मनीषा यादव (भाजप)
वॉर्ड 32 – गीता भंडारी (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)
वॉर्ड 33 कमरजहो सिद्धिकी- काँग्रेस
वॉर्ड 34- हैदर अली शेख, काँग्रेस
वॉर्ड 35 – वर्मा योगेश रणबहादूर भाजप
वॉर्ड 36 – सिद्धार्थ शर्मा (भाजप)
वॉर्ड 37 – योगीता कदम (शिवसेना ठाकरे)*
वॉर्ड 38 – सुरेखा परब, मनसे
वॉर्ड 39 – पुष्पा कळंबे शिवसेना ठाकरे
वॉर्ड 40 – तुळशीराम शिंदे (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 41 – सुहास वाडकर (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 42 – धनश्री भडरकर, शिवसेना शिंदे
वॉर्ड – 43 अजित रावरणर, शरद पवार
वॉर्ड 44 – संगीता शर्मा, भाजप
वॉर्ड 45 – संजय कांबळे, भाजप
वॉर्ड 46 – योगिता कोळी (भाजप)
वॉर्ड 47 – तेजिंदर तिवाना (भाजप)
वॉर्ड 48 – रफिक शेख, काँग्रेस
वॉर्ड 49 – संगिता कोळी, काँग्रेस
वॉर्ड 50 – विक्रम राजपूतप्रतापसिंह(भाजप)
वॉर्ड 51 – वर्षा टेंबवलकर (शिवसेना)
वॉर्ड 52 – प्रति साटम (भाजप)
वॉर्ड 53 – वळवी जितेंद्र हिरालाल (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 54 – अंकित प्रभू (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 55- हर्ष पटेल (भाजप)
वॉर्ड 56 – लक्ष्मी भाटिया ( (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 57 – पिल्ले श्रीकला रामचंद्र (भाजपा)
वॉर्ड 58 – संदीप पटेल भाजप
वॉर्ड 59 – यशोधर फणसे शिवसेना ठाकरे
वॉर्ड 60 – सायली कुलकर्णी भाजप
वॉर्ड – 61 दिव्या सिंह, काँग्रेस
वॉर्ड – 62 जिशान मुलतानी, शिवसेना ठाकरे
वॉर्ड – 63 रूपेश सावरकर, भाजप
वॉर्ड – 64 खान सबा हारून रशीद, शिवसेना ठाकरे
वॉर्ड – 65 बंदेरी विठ्ठल, भाजप
वॉर्ड – 66 मेहर हैदर, काँग्रेस
वॉर्ड – 67 दीपक कोतेकर, भाजप
वॉर्ड – 68 रोहन राठोड, भाजप
वॉर्ड – 69 सुधा सिंग, भाजप
वॉर्ड – 70 अनिष मकवाणी, भाजप
वॉर्ड – 71 सुनील मेहता, भाजप
वॉर्ड – 72 ममता यादव, भाजप
वॉर्ड – 73 लोना रावत (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड – 74 विद्या आर्या कांगणे, मनसे
वॉर्ड – 75 प्रमोद सावंत, शिवसेना ठाकरे
वॉर्ड – 76 प्रकाश मुसळे, भाजपा
वॉर्ड – 77 शिवानी परब, शिवसेना ठाकरे
वॉर्ड -78 सोफी नाजिया अब्दुल जब्बार, शिंदे शिवसेना
वॉर्ड – 79 मानसी जुवाटकर शिवसेना ठाकरे)
वॉर्ड – 80 दिशा यादव, भाजप
वॉर्ड – 81 केशरबेहन पटेल, भाजप
वॉर्ड – 82 अमीन जगदीश, भाजप
वॉर्ड – 83 सोनाली साबे(शिवसेना ठाकरे)
वॉर्ड – 84 अंजली सामंत, भाजप
वॉर्ड – 85 मिलिंद शिंदे, भाजप
वॉर्ड – 86 रितेश कमलेश राय, शिवसेना
वॉर्ड 87 पूजा महाडेश्वर (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 88 शर्वरी परब (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 89 गीतेश राऊत, शिवसेना ठाकरे
वॉर्ड 90 तुलीप मिरांडा, काँग्रेस
वॉर्ड 91 सगुण नाईक, शिवसेना शिंदे
वॉर्ड 92 इब्राहम कुरेश, काँग्रेस
वॉर्ड 93 रोहिणी कांबळे, शिवसेना ठाकरे
वॉर्ड 94 प्रज्ञा भुतकर, शिवसेना ठाकरे
वॉर्ड 95 हरी शाश्री, शिवसेना ठाकरे
वॉर्ड 96 खान शम्स, एनसीपी
वॉर्ड 97 हेतल गाला, भाजपा
वॉर्ड 98 अलका केरकर, भाजप
वॉर्ड 99 चिंतामनी निवाटे, शिवसेना ठाकरे
वॉर्ड 100 स्वप्ना म्हात्रे, भाजप
वॉर्ड 101 कॅरन डिमेलो, काँग्रेस
वॉर्ड 102 रेहबर खान, काँग्रेस
वॉर्ड 103 – हेतल गाला मोरवेकर, भाजप
वॉर्ड 104- प्रकाश गंगाधरे (भाजप)
वॉर्ड 105 अनिता वैती, भाजप
वॉर्ड 106 प्रभाकर शिंदे, भाजप
वॉर्ड 107 – नील किरीट सोमय्या, (भाजप)
वॉर्ड 108 दीपिका घाग, भाजप
वॉर्ड 109 सुरेश शिंदे शिवसेना ठाकरे
वॉर्ड 110 आशा कोपरकर, काँग्रेस
वॉर्ड 111 दिपक सावंत, शिवसेना ठाकरे
वॉर्ड 112 साक्षी दळवी, भाजप
वॉर्ड 113 दिपमाला बढे, शिवसेना ठाकरे
वॉर्ड 114 राजुल पाटील, शिवसेना ठाकरे
वॉर्ड 115 राजभोज ज्योती अनिल, मनसे
वॉर्ड 116 जागृती पाटील, भाजप
वॉर्ड 117 श्वेता पावसकर, शिवसेना ठाकरे
वॉर्ड 118 सुनीता जाधव, शिवसेना ठाकरे
वॉर्ड 119 राजेश सोनावळे, शिवसेना शिंदे
वॉर्ड 120 विश्वास शिंदे, शिवसेना ठाकरे
वॉर्ड 121- प्रियदर्शनी, ठाकरे (उबाठा)
वॉर्ड 122- चंदन शर्मा, भाजप
वॉर्ड 123 – सुनील मोरे (शिवसेना – उबाठा)
वॉर्ड 124 – शकीना शेख (शिवसेना – उबाठा)
वॉर्ड 125 सुरेश आवळे शिंदे शिवसेना
वॉर्ड 126 अर्चना भालेराव (भाजप)
वॉर्ड 127 स्वरूपा पाटील शिवसेना ठाकरे
वॉर्ड128 सई शिर्के मनसे
वॉर्ड 129 अश्विनी मते शिवसेना ठाकरे
वॉर्ड 130 धर्मेश गिरी भाजप
वॉर्ड 131 राखी जाधव भाजप
वॉर्ड 132 रितू तावडे भाजप
वॉर्ड 133 निर्मिती कारंडे शिवसेना शिंदे
वॉर्ड 134 मेहजेबीन खान (एमआय एम)
वॉर्ड 135 – नवनाथ बन(भाजप)
वॉर्ड 136 जमीर कुरेशी (एमआयएम)
वॉर्ड 137 पटेल समीर रमजान (एमआयएम)
वॉर्ड 138 रोशन शेख एमआयएम
वॉर्ड 139 शबाना शेख एमआय एम
वॉर्ड 140 – विजय उबाळे एमआयएम
वॉर्ड 141 विठ्ठल लोकरे शिवसेना ठाकरे
वॉर्ड 142 अपेक्षा खांडेकर शिवसेना शिंदे
वॉर्ड 143 शहांना काझी – एमआयएम
वॉर्ड 144 दिनेश पांचाळ भाजप
वॉर्ड 145 खैरूनिस्सा अकबर हुसेन (एमआयएम)
वॉर्ड 146 समृद्धी काठे (शिवसेना शिंदे)
वॉर्ड 147 प्रज्ञा सदाफुले (शिवसेना शिंदे)
वॉर्ड 148 अंजली नाईक शिवसेना शिंदे
वॉर्ड 149 सुषम सावंत भाजप
वॉर्ड 150 वैशाली शेंडकर काँग्रेस
वॉर्ड 151 कशिश फुलवरिया भाजप
वॉर्ड 152 आशा मराठे भाजप
वॉर्ड 153 मीनाक्षी पाटणकर शिवसेना ठाकरे
वॉर्ड 154 महादेव शिवगण भाजप
वॉर्ड 155 स्नेहल शिवकर शिवसेना ठाकरे
वॉर्ड 156 – अश्विनी माटेकर (शिवसेना)
वॉर्ड 157 – आशा तवडे (भाजप)
वॉर्ड 158 चित्रा सांगळे (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 159 प्रकाश मोरे भाजप
वॉर्ड 160 किरण लांडगे शिवसेना ठाकरे
वॉर्ड 161 विजेयद्र शिंदे शिवसेना शिंदे
वॉर्ड 162 अमिर खान कांग्रेस
वॉर्ड 163 – शैला लांडे (शिवसेना)
वॉर्ड 164 हरीश भांदिर्गे भाजप
वॉर्ड 165 – अशरफ आझमी (काँग्रेस)
वॉर्ड 166 मीनल तुर्डे (शिवसेना शिंदे)
वॉर्ड 167 समन आझमी (कांग्रेस)
वॉर्ड 168 सइदा खान कांग्रेस
वॉर्ड 169 – प्रविणा मोरजकर (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 170 बुशरा नदीम (कांग्रेस)
वॉर्ड 171 राणी येरुनकर (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 172 राजश्री शिरवडकर (भाजपा)
वॉर्ड 173 – शिल्पा केळुसकर (भाजपा)
वॉर्ड 174 – साक्षी कनोजिया (भाजपा)
वॉर्ड 175 – मानसी सातमकर (शिवसेना शिंदे)
वॉर्ड 176 रेखा यादव (भाजपा)
वॉर्ड 177 कल्पेशा कोठारी (भाजप)
वॉर्ड 178 अमेय अरुण घोले (शिवसेना शिंदे
वॉर्ड 179 दिपाली खेडेकर (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 180 तृष्णा विश्वासराव शिंदे शिवसेना
वॉर्ड 181 अनिल कदम, शिवसेना – उबाठा
वॉर्ड 182 – मिलिंद वैद्य (शिवसेना – उबाठा)
वॉर्ड 183 – आशा काळे (काँग्रेस)
184 – सजिदाबी खान काँग्रेस
वॉर्ड 185 टी एम जगदीश (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 186 अर्चना शिंदे (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 187 – जोसेफ कोळी (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 188 भास्कर शेट्टी शिवसेना शिंदे
वॉर्ड 189 हर्षला मोरे ठाकरे शिवसेना
वॉर्ड 190 शीतल गंभीर भाजप
वॉर्ड 191 विशाखा राऊत, शिवसेना ठाकरे
वॉर्ड 192 यशवंत किल्लेदार मनसे
वॉर्ड 193 – हेमांगी वरळीकर (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 194 निशिकांत शिंदे (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 195 विजय बाणगे (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 196 पद्मजा चेंबुरकर (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 197 – वनिता नरवणकर ( शिवसेना शिंदे)
वॉर्ड 198 – आबोली खाड्ये ( शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 199 – किशोरी पेडणेकर ( शिवसेना ठाकरे
वॉर्ड 200- उर्मिला पांचाळ (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 201 – इरम सिद्दीकी (इतर)
वॉर्ड 204- किरण तावडे ( शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 205 – सुप्रिया दळवी ( मनसे)
वॉर्ड 206 – सचिन पडवळ ( शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 207 – रोहिदास लोखंडे (भाजप)
वॉर्ड 208 रमाकांत रहाटे (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 209 यामिनी जाधव (शिवसेना शिंदे)
वॉर्ड 210 सोनम जामसूतकार (शिवसेना ठाकरे)
वॉर्ड 212 अब्रहणी अमरीन शेहजाद (सपा)
वॉर्ड 213 नसीमा जुनेजा कांग्रेस
वॉर्ड 214 – अजय पाटील (भाजप)
वॉर्ड 215 – संतोष ढोले (भाजप)
वॉर्ड 216- राजश्री भातणकर ( भाजप)
वॉर्ड 217- गौरंग झवेरी (भाजपा)
वॉर्ड 221- आकाश पुरोहित भाजप
वॉर्ड 222- रिटा मकवाना भाजप
वॉर्ड 223- ज्ञानराज निकम काँग्रेस
वॉर्ड 224- पारक अमीन काँग्रेस
वॉर्ड 225- हर्षिता नार्वेकर भाजप
वॉर्ड 226- मकरंद नार्वेकर भाजप
वॉर्ड 227- गौरवी शिवल नार्वेकर, भाजप

तुमची प्रतिक्रिया:
error: Content is protected !!