ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

रोहित पवारांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी:सुप्रिया सुळेंची मागणी; रोहित पवार जनतेच्या मनातील प्रश्न मांडत असल्याचा दावा

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर निर्माण झालेल्या शंका-कुशंकांना आता नवे वळण मिळाले आहे. अपघात की घातपात, या चर्चेमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडूनही काही शंका व्यक्त करण्यात आल्या. आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही मौन सोडत या प्रकरणावर पहिल्यांदाच स्पष्ट भूमिका मांडली आहे. गेल्या महिन्यात 28 जानेवारी रोजी अजित पवार यांचे विमान कोसळले आणि त्यात त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. मात्र काही दिवसांनंतर या दुर्घटनेविषयी अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. रोहित पवार यांनी तीन वेळा पत्रकार परिषद घेऊन तपासाच्या गतीबाबत नाराजी व्यक्त केली. त्यांनी काही तांत्रिक बाबी आणि संबंधित कंपनीबाबत शंका उपस्थित करत तपास अधिक वेगाने आणि निष्पक्ष व्हावा, अशी मागणी केली. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनीही सामाजिक माध्यमांवर पोस्ट करून ‘ब्लॅक बॉक्स’ संदर्भात शंका व्यक्त केली. विमान दुर्घटनेत ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही, असे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रातील जनतेला या घटनेचे संपूर्ण, पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे, असे त्यांनी लिहिले. तसेच संबंधित उड्डाण सेवा देणाऱ्या कंपनीवर बंदी घालण्याची मागणीही त्यांनी केली. त्यामुळे या प्रकरणातील चर्चेला आणखी धार मिळाली. या सर्व घडामोडींनंतर सुप्रिया सुळे यांनी सामाजिक माध्यमावर सविस्तर भूमिका मांडली. त्यांनी म्हटले की, अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर महाराष्ट्र हादरला आहे. समाजमाध्यमांवर अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत आणि जनभावना तीव्र आहेत. लोक अजूनही शोकातून सावरलेले नाहीत. अशा वेळी रोहित पवार अभ्यासपूर्ण पद्धतीने काही मुद्दे मांडत आहेत. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळालीच पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले. सुळे यांनी पुढे नमूद केले की, जर तपासात उशीर होत असेल तर अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. ती टाळण्यासाठी संपूर्ण सत्य पारदर्शकपणे लोकांसमोर येणे आवश्यक आहे. व्यवस्थेला प्रश्न विचारणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनादत्त अधिकार आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. रोहित पवार हे जनतेच्या मनातील प्रश्न मांडत असल्याचे सांगत त्यांनी त्यांना योग्य प्रतिसाद मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. रोहित पवार यांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी याचबरोबर सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार यांच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला. या पार्श्वभूमीवर त्यांना कडेकोट सुरक्षा मिळणे अत्यंत गरजेचे असून त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. कालच्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी आपल्या कुटुंबीयांना त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता वाटत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे सुळे यांच्या मागणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सुरू झालेली ही चर्चा आता अधिक गंभीर होत चालली आहे. कुटुंबीयांकडून उपस्थित होणारे प्रश्न, ब्लॅक बॉक्सबाबतची शंका, तपासाच्या गतीवरील नाराजी आणि आता सुप्रिया सुळे यांची पारदर्शक चौकशीची मागणी यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांत तपास यंत्रणा काय भूमिका घेते आणि शंकांचे निरसन कसे होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर