ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

तिकीट द्या नाहीतर जीवाचे बरे-वाईट करून घेईन:भाजप कार्यकर्त्याची थेट धमकीच, व्हिडिओ व्हायरल झाल्याने सोलापुरात खळबळ

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून अनेक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आपल्याला तिकीट मिळावे यासाठी अनेकजण आपआपल्या परीने तयारी करत असतात. त्यातच आता सोलापूरमधून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. मला उमेदवारी मिळायलाच हवी, अन्यथा माझ्या जीवाचे बरे-वाईट झाल्यास त्याला पक्ष जबाबदार असेल, असा इशाराच इच्छुक उमेदवार अनंत धुम्मा यांनी दिला आहे. सोलापूर महानगरपालिकेत निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून भाजपमध्ये अंतर्गत वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या 40 वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते अनंत धुम्मा यांनी उमेदवारी मिळावी यासाठी थेट भाजप पक्षाच्या नेत्यांनाच इशारा दिला आहे. मला उमेदवारी न मिळाल्यास जीवाचे बरे-वाईट करून घेईल आणि याला पक्ष जबाबदार असेल, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण 102 जागांवर निवडणूक होणार आहे. या जागांसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी झाली असून तब्बल 1200 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले आहेत. यात जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनंत धुम्मा हे मागील 40 वर्षांपासून भापचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. तसेच त्यांना या निवडणुकीत संधी मिळावी म्हणून ते आग्रही आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात त्यांनी उमेदवारी नाही मिळाली तर थेट आत्महत्येचा इशारा दिल्याचे दिसून येत आहे. अनंत धुम्मा नेमके काय म्हणाले? व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनंत धुम्मा म्हणतात की, मी गेल्या 40 वर्षांपासून भाजपचे काम करत आहे. पक्ष स्थापन झाल्यापासून मी काम करत आहे. भाजप पक्षावर विश्वास ठेऊन मी पक्षाचे काम करत आहे. मला यावेळी 100 टक्के न्याय मिळेल, असे मला वाटत आहे. तसेच मी भाजपला सांगू इच्छितो की माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यासोबत जर तुम्ही चुकीचे करत असाल आणि माझ्या जीवाचे बरे-वाईट काही झाले तर त्याला मी जबाबदार नाही, असे त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. पुढे बोलताना अनंत धुम्मा यांनी म्हटले की, मी नगरसेवक नसतानाही एक कार्यकर्ता म्हणून आज केंद्राच्या योजना, राज्य सरकारच्या योजना घराघरात पोहोचवल्या आहेत. मी इतके सर्व काम करून जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर स्वतःला काहीतरी करून घेण्याशिवाय पर्याय नाही. जे निष्ठावंत आहेत, जे काम करतात त्यांना 100 टक्के न्याय देण्याचे प्रयत्न करा, असे आवाहन धुम्मा यांनी केले आहे. तसेच हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आपण ते विधान भावनेच्या भरात केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर काय म्हणाल्या? या संपूर्ण प्रकरणावर सोलापूरच्या भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, सर्वच कार्यकर्त्यांना आपल्याला न्याय मिळावा असे वाटते, मात्र पक्षाला काही निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतात. तसेच कोणत्याही कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन शहराचे वातावरण बिघडवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. एकंदरीतच जुन्या व नव्या कार्यकर्त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला तडवळकर यांनी दिला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर