ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video

7 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बीड : पावसाळ्याच्या दिवसांत जनावरांमध्ये विविध संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यामध्ये लम्पी स्किन डिसीज हा गायी आणि म्हशींमध्ये आढळणारा विषाणूजन्य आजार आहे. या आजाराची लागण झाल्यानंतर जनावरांच्या शरीरावर, विशेषतः पाठीवर, मानेला तसेच पायांवर गोलाकार गाठी निर्माण होऊ लागतात. सुरुवातीला लहान दिसणाऱ्या या गाठी कालांतराने मोठ्या होऊ शकतात. जनावराला ताप येणे, अशक्तपणा, डोळे आणि नाकातून स्राव येणे, शरीरावर सूज येणे आणि चालताना त्रास होणे अशी लक्षणेही दिसून येतात. ताप आणि शरीरातील वेदनांमुळे काही जनावरे पायाने लंगडताना दिसतात.

या आजारामुळे जनावरांची भूक मंदावते आणि त्यांच्या खानपानाचे प्रमाण कमी होते. परिणामी जनावर अशक्त होण्याबरोबरच दूध देणाऱ्या गायी-म्हशींच्या दूध उत्पादनातही घट होऊ शकते. लम्पीचा प्रसार प्रामुख्याने डास, गोमाशा, चावणाऱ्या माशा आणि गोचीड यांसारख्या रक्तशोषक कीटकांमुळे होतो. त्यामुळे गोठ्यातील स्वच्छता, कीटक नियंत्रण आणि आजारी जनावरांचे विलगीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक पवार यांनी अशी माहिती दिली.

लम्पीचा संशय आल्यास आजारी जनावराला तातडीने इतर जनावरांपासून वेगळे बांधावे. त्यासाठी स्वतंत्र जागा ठेवून गोठा स्वच्छ व कोरडा ठेवणे आवश्यक आहे. आजारी जनावरावर स्वतःहून औषधोपचार न करता पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करावेत. जनावरांची तपासणी करण्यासाठी पशुवैद्यकीय तज्ज्ञ किंवा कर्मचारी आल्यानंतर तपासणीपूर्वी आणि तपासणीनंतर हात, वापरलेली उपकरणे आणि आवश्यक साहित्य योग्य पद्धतीने निर्जंतुक करणे महत्त्वाचे आहे. विशेषतः एका जनावराची तपासणी केल्यानंतर दुसऱ्या जनावराची तपासणी करताना स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाची काळजी घेतल्यास संसर्गाचा धोका कमी करण्यास मदत होते. आजारी जनावरांच्या जखमा स्वच्छ ठेवणे आणि त्यांना पुरेसे पाणी आणि पौष्टिक खाद्य देणेही आवश्यक आहे.

बाजारातून नवीन बैल, गाय, म्हैस किंवा इतर जनावर खरेदी करून आणताना पशुपालकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नवीन जनावर थेट जुन्या जनावरांसोबत गोठ्यात बांधण्याऐवजी काही काळ स्वतंत्र ठेवून त्याच्या आरोग्याची तपासणी करावी. शरीरावर गाठी, ताप, जखमा, अशक्तपणा, भूक कमी होणे किंवा इतर संशयास्पद लक्षणे आहेत का, हे तपासावे. शक्य असल्यास पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून जनावराची तपासणी करून घेतल्यानंतरच त्याला इतर जनावरांच्या संपर्कात आणावे. तपासणीदरम्यान संशयास्पद लक्षणे आढळल्यास नवीन जनावराला तातडीने वेगळे ठेवून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यामुळे गोठ्यातील निरोगी जनावरांना संसर्ग होण्याचा धोका कमी करता येतो.

लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गोठ्यातील शेण, साचलेले पाणी आणि अस्वच्छता नियमितपणे दूर करावी. डास, गोमाशा आणि इतर रक्तशोषक कीटकांचे नियंत्रण करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने योग्य उपाययोजना कराव्यात. आजारी जनावरांची ने-आण टाळावी तसेच त्यांच्या संपर्कात आलेली उपकरणे, दोर आणि इतर साहित्य स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवावे. जनावरांच्या अंगावर गाठी दिसणे, ताप येणे किंवा चालताना लंगडणे अशी लक्षणे आढळल्यास वेळ न दवडता पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. वेळीच निदान, विलगीकरण, स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास लम्पीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यास मदत होऊ शकते.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर