ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

नियुक्ती मोर्शीत असतानाही कामकाज अमरावतीतून सुरु; शेतकऱ्यांचा आरोप

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पदोन्नतीद्वारे मोर्शी वन परिक्षेत्रात नियुक्ती मिळालेले सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व अतिक्रमण निर्मूलन) हे आपल्या अधिकृत नियुक्तीच्या ठिकाणी हजर न राहता अमरावती येथील मुख्य कार्यालयातूनच कामकाज करतात. त्यामुळे मोर्शी परिसरातील शेतकरी, वनहक्कधारक आणि सामान्य नागरिकांची मोठी हेळसांड होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उपवनसंरक्षकांना यासंदर्भात निवेदन सादर करून सखोल चौकशीची मागणी केली आहे. डॉ. मयूर भैलूमे असे या सहायक वनसरंक्षकांचे नाव आहे. डॉ. भैलूमे यांनी मोर्शी वन परिक्षेत्र कार्यालयात नियमित उपस्थित राहून कामकाज करणे बंधनकारक होते. मात्र, ते मोर्शीऐवजी अमरावती वन विभाग कार्यालयात बसूनच प्रशासकीय कामे पाहत आहेत. परिणामी, स्थानिक नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आपल्या लहान-सहान कामांसाठी व स्वाक्षऱ्यांसाठी नाहक आर्थिक भुर्दंड सहन करत अमरावतीचे हेलपाटे मारावे लागत आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी संबधित अधिकाऱ्याला तात्काळ मोर्शी येथे नियमित कर्तव्य बजावण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी अमित अढाऊ यांनी केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ, दिनेश आमले, राजू वऱ्हाडे, कुंदन काळे, अनिल पावडे यांनी दिला आहे. अतिरीक्त कार्यभार असल्यामुळे अमरावतीत माझी नियुक्ती मोर्शीत आहे, त्याचवेळी उपवनसरंक्षक (मेळघाट व्याघ्र प्रकल्प) हा अतिरीक्त कार्यभारसुध्दा आहे. त्यामुळे अमरावतीत कामकाज करतो. तसेच मोर्शी परिसरातील शेतकऱ्यांच्या वनहक्क दाव्यांचे विषय व इतरही प्रकरण आम्ही तातडीने निकाली काढतो. – डॉ. मयूर भैलूमे, सहायक वनसंरक्षक.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर