ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे?

6 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबई: कोकणातील गणेशोत्सव जगभर प्रसिद्ध आहे. या काळात मुंबईसह देशभरात असणारे कोकणवासीय आवर्जून गावी जात असतात. त्यामुळे रेल्वेला मोठी गर्दी असते. हीच गर्दी विचारात घेऊन रेल्वेकडून कोकणासाठी विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली. मात्र, या गाड्यांच्या थांब्यावरून कोकणवासीयांत नाराजी होती. आता ही नाराजी दूर करण्यासाठी रेल्वेने मोठा निर्णय घेतला असून अतिरिक्त थांब्यांची घोषणा केली आहे.

सीएसएमटी-सावंतवाडी रोड गाडी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते सावंतवाडी रोड गणपती विशेष गाडीला (क्र. 01103/01104) सापे वामने आणि विन्हेरे स्थानकांवर अतिरिक्त थांबे मंजूर करण्यात आले आहेत.

Mumbai : तासांचा प्रवास आता मिनिटांत! मुंबईत आजपासून नव्या प्रकल्पांची धमाकेदार सुरुवात; वाचा कोणत्या भागांना होणार फायदा?

सीएसएमटी-रत्नागिरी गाडी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते रत्नागिरी गणपती विशेष गाड्यांना (क्र. 01153/01154) अतिरिक्त थांबे असणार आहेत. दोन्ही बाजूंच्या प्रवासात ही गाडी कडवई येथे थांबेल.

प्रवाशांची नाराजी दूर

कोकणात जाणाऱ्या गणपती विशेष गाड्यांना वीर आणि खेडदरम्यान थांबा नव्हता. त्यामुळे सापे वामने, करंजाडी, विन्हेरे परिसरातील प्रवाशांत नाराजी होती. प्रवाशांची हीच अडचण लक्षात घेऊन कोकण रेल्वेने या गाड्यांना वीर ते खेडदरम्यान अतिरिक्त थांबे देण्यासाठी प्रयत्न होत होते. त्याला यश आले असून सापे वामने आणि विन्हेरे येथे रेल्वेगाडीला थांबे मंजूर करण्यात आले आहेत.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते सावंतवाडी रोड दैनिक गणपती विशेष गाडी 11 ते 26 सप्टेंबरदरम्यान धावेल.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर