ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …

5 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


Satish Maratha Murder Case : गेल्या काही वर्षात गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे. सातबारा गोळा करण्यापासून आता दारूच्या धंद्यापर्यंत गुन्हेगारांनी वचक बसवल्याचं पहायला मिळतंय. रिअर इस्टेटमध्ये हात पाय पसरल्यानंतर सुरतमध्ये आपलं वर्चस्व निर्माण करणाऱ्या धुळ्याच्या सतीश मराठा याची हत्या करण्यात आली. त्याच्यावर तलवारीने 39 वार करत हल्ला करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवरही अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. अशातच आता सतीशवर हल्ला करणाऱ्या राहुल अपार्टमेंटचा शेवटचा व्हिडीओ समोर आलाय.
‘सगळे नवे जुने संपवून प्रत्येक चौकात मीच टिकणार…’
गेल्या काही दिवसांपासून सतीश मराठा आणि राहुल अपार्टमेंट यांच्यात पैशांच्या कारणास्तव वाद सुरू होता. त्यामुळे दोघांच्या गँग अॅक्टिव झाल्या होत्या. दोघांमध्ये खुन्नस वाढत चालली होती. अशातच सतीश मराठावर हल्ला करण्याआधी राहुलने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. मुळशी पॅटर्न सिनेमातील डायलॉगवर हा व्हिडीओ शेअऱ केलाय. सगळे नवे जुने संपवून प्रत्येक चौकात मीच टिकणार, मी प्लास्टिक आहे साहेब… असा डायलॉग या व्हिडीओला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

View this post on Instagram

A post shared by J A C K Y   (@xx__mr_jacky_xx__)

राहुलच्या हातावर सतीशच्या चेहऱ्याचा टॅटू
राहुल अपार्टमेंट नावाचा गुन्हेगार आपल्या ‘SR COMPANY’ या इन्स्टाग्राम पेजवरून स्वतःचे मोठेपण दाखवणारे व्हिडिओ पोस्ट करत असे. काळ्या कारमधून नेत्यांसारखे उतरणे आणि हिंदी चित्रपटांचे संवाद वापरून तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न या टोळीकडून सातत्याने सुरू होता. सतीश मराठा आणि राहुल यांनी मिळूनच या टोळीची स्थापना केली होती. सतीश आणि राहुल यांच्यात अत्यंत घट्ट मैत्री होती. राहुल जेव्हा जेलमध्ये होता, तेव्हा सतीशने त्याच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेतली होती. या उपकाराची परतफेड म्हणून राहुलने स्वतःच्या हातावर सतीशच्या चेहऱ्याचा टॅटू देखील काढून घेतला होता.
“मेरे बाप से नहीं हुआ तो मेरे बाप की कसम किसी से नहीं होगा”
दरम्यान, हत्येच्या काही दिवस आधी खुद्द सतीश मराठाने कोर्टाच्या लॉकअपमधून एक व्हिडिओ तयार केला होता. “मेरे बाप से नहीं हुआ तो मेरे बाप की कसम किसी से नहीं होगा” असा डायलॉग असलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. थेट लॉकअपमधून असा व्हिडिओ बाहेर आल्यामुळे पोलीस बंदोबस्ताचे पितळ उघडे पडले आहे. हे दोघंही प्रत्येक गुन्हेगारी कारवाईत आणि सार्वजनिक ठिकाणी नेहमी एकत्रच पहायला मिळायचं.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर