ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

छत्रपती संभाजीनगर शहरात वीजांच्या कडकडाटासह कोसळधारा:राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी; शेतकऱ्यांचे नुकसान

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यात सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक भागांत वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस सुरू झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका शेती पिकांना बसत असल्याने बळीराजा कमालीचा हवालदिल झाला आहे. विशेषतः फळबाग उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत असून द्राक्ष, आंबा, काजू आणि केळी यांसारख्या नगदी पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. आज रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर शहरासह अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव शहरात निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळाले. दुपारच्या सुमारास अचानक ढगांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, ज्यामुळे नागरिकांची मोठी धावपळ उडाली. या पावसात मोठ्या प्रमाणावर गारांचा वर्षाव झाल्याने सोयगाव शहर आणि परिसरात रस्त्यांवर तसेच घरांच्या छतावर गारांचा पांढराशुभ्र थर साचला होता. मार्च महिन्याच्या उत्तरार्धात झालेल्या या अनपेक्षित गारपिटीमुळे वातावरणात तात्पुरता गारवा निर्माण झाला असला तरी, या संकटामुळे शेती आणि फळबागांच्या संभाव्य नुकसानीची भीती अधिक गडद झाली आहे. सातारा जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहिल्यानंतर, संध्याकाळच्या सुमारास फलटण तालुक्यातील धुमाळवाडी आणि गिरवी परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार गारपीट झाली. सुमारे अर्धा तास कोसळलेल्या या गारांच्या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांसह धुमाळवाडीतील डाळिंब बागा आणि आंब्याच्या मोहराचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसला असून, सटाणा तालुक्यातील ताहाराबाद, मुल्हेर आणि अंतापूर परिसरात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार गारपीट झाली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे केवळ शेतकरीच नव्हे, तर स्थानिक बाजारपेठेतील व्यापारी वर्गाचीही मोठी धावपळ उडाली असून, संपूर्ण परिसरात एकच दाणादाण उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर