ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

नाना पटोलेंची सुपारी घेऊन राजकीय चिखलफेक:भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा जोरदार पलटवार; पटोलेंनी भूमाफियाचा केला होता आरोप

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी स्टॅम्प ड्युटी घोटाळ्याप्रकरणी केलेले आरोप भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी जोरकसपणे फेटाळून लावले आहेत. माझ्यावरील स्टॅम्प ड्युटी घोटाळ्याचे आरोप पूर्णतः निराधार आहेत. राजकीय शत्रूंनी दिलेल्या सुपारीवरून माझ्यावर ही चिखलफेक केली जात आहे, असे ते म्हणालेत. महसूल विभागाच्या एका पत्रात भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा उल्लेख चक्क भूमाफिया असा करण्यात आल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी नरेंद्र मेहता यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. महसूल वनिभागाने 20 जून 2025 च्या आपल्या पत्रात सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शनचे मालक नरेंद्र लालचंद मेहता यांनी मुद्रांक शुल्क व दंड थकवल्याचा उल्लेख आहे. या पत्रात मेहता यांचा उल्लेख स्पष्टपणे भूमाफिया असा करण्यात आला आहे. या पत्रावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची स्वाक्षरी आहे. त्यामुळे आता त्यांनी मेहतांवर कारवाई करून दाखवावी, असे पटोले यांनी म्हटले आहे. माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे नाना पटोले यांच्या या आरोपांना नरेंद्र मेहता यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. आमचे सर्व व्यवहार अत्यंत पारदर्शक आहेत. राजकीय शत्रूंनी दिलेल्या सुपारीवरून ही चिखलफेक करण्यात येत आहे. नाना पटोले यांनी ज्या योजनेचा उल्लेख केला, ती योजना महाविकास आघाडी सरकारच्या काळात विशेषतः पटोले सभापती असतानाच आणली गेली. या योजनेत काही त्रुटी असतील तर मविआ सरकारने बिल्डरांना खूश करण्यासाठी ही योजना आणली होती का? याचा खुलासा नाना पटोले यांनी करावा. माझ्या नावावर आमदार होण्यापूर्वी केवळ एकच जागा होती. तिची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आमची कोणतीही स्टॅम्प ड्युटी थकलेली नाही. आमच्याकडे 4-5 लोक असे आहेत जे केवळ ब्लॅकमेलर व चीटर आहेत. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. हे पेड वर्कर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे सतत खोट्या तक्रारी करत असतात. पण त्यात कोणतेही तथ्य नसते. राजकीय द्वेषापोटी आरोप नरेंद्र मेहता पुढे म्हणाले, आम्ही मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसचे अस्तित्व संपवले. याचा राग मनात धरून हे स्थानिक नेते नाना पटोले यांना चुकीची माहिती पुरवत आहेत. माझ्यावर 5-6 महिन्यांपूर्वीच्या एका जुन्या पत्राचा आधार घेऊन केवळ राजकीय द्वेषापोटी आरोप केले जात आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे नरेंद्र मेहता यांनी यावेळी रुग्णालयात उंदीर चावल्यामुळे महिलेच्या झालेल्या मृत्यूवर तीव्र संताप व्यक्त् केला. ही अत्यंत गंभीर घटना असून, संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर