ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी

2.4k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

गौराळा फाट्याजवळ अपघात; साई मित्र परिवाराच्या रुग्णवाहिकेने जखमीला रुग्णालयात दाखल

सुरेश पाचभाई | मारेगाव

A motorcycle hit a stationary truck from behind; a young man was seriously injured

Accident near Gaurala Phata; The injured were taken to the hospital by the ambulance of Sai Mitra Parivar

मारेगाव: बजाज फायनान्सच्या कामानिमित्त मारेगाव येथे आलेल्या २७ वर्षीय दुचाकीस्वाराची रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार शुभम रवींद्र ठावरी गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी (१३ ऑगस्ट) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास गौराळा फाट्याजवळ घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम रवींद्र ठावरी (वय अंदाजे २७, रा. आष्टी, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) हे बजाज फायनान्सच्या कामानिमित्त मारेगाव येथे आले होते. काम आटोपून दुचाकीने आष्टीकडे परत जात असताना गौराळा फाट्याजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला त्यांच्या दुचाकीची मागून जोरदार धडक बसली.

धडक एवढी भीषण होती की शुभम ठावरी यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून हाताचा पूर्णपणे तुकडा पडल्याची माहिती आहे. अपघातानंतर ते गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले होते.
घटनेची माहिती मिळताच रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी तत्काळ साई मित्र परिवाराच्या रुग्णवाहिकेला माहिती दिली.

काही वेळातच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमी शुभम ठावरी यांना तातडीने मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान, अपघातामुळे गौराळा फाट्याजवळ काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती. मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे स्थलांतरित केल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनीही पुढील तपास सुरू केला आहे.या अपघाताचा पुढील तपास ठाणेदार सागर दानडे व पोलीस उपनिरीक्षक रवी बुरकुले यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलीस करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर