अजितदादांकडे भाजपच्या घोटाळ्याची फाइल होती. त्यांचा विमानाचा रहस्यमय झालेला अपघात पाहता जस्टीस लोया प्रकरणाची आठवण झाल्याचा आरोप, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला. आपण हे प्रकरण पार्लमेंटमध्ये उचलणार असल्याचा इशाराही त्यांना दिला. दरम्यान, ‘जस्टीस लोया प्रकरणातही काहीही झालेले नाही. अजितदादा प्रकरणात जे काही आहे, ते दूध का दूध आणि पानी का पानी होईल, असे उत्तर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांना दिले. तर उज्जल निकम यांनी ‘जस्टीस लोया यांचा मृत्यू हृदविकाराने झाला होता,’ म्हणत संजय राऊत यांना उत्तर दिले. मी उघड करणार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले असतानाच, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आज अनेक खळबळजनक दावे करत सत्ताधारी भाजप आणि महायुती सरकारवर तोफ डागली आहे. “अजित पवारांचा मृत्यू हा निव्वळ अपघात आहे की घातपात?” अशी शंका उपस्थित केली. अजित पवारांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करताना संजय राऊत म्हणाले की, “अजित पवार स्वगृही परतणे हा भाजपसाठी मोठा पराभव ठरला असता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, १५ जानेवारी रोजी दादांनी जाहीरपणे सांगितले होते की, ‘माझ्याकडे भाजपच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि ती मी उघड करीन.’ त्यानंतर अवघ्या १० दिवसांत त्यांच्या विमानाचा अपघात होणे हे अत्यंत रहस्यमय आहे.” अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले ५ प्रश्न गंभीर असून हे प्रकरण ‘जस्टीस लोया’ प्रकरणासारखे संशयास्पद वाटत असल्याचेही राऊत म्हणाले. दादांजवळील कागदं जळालेले नाहीत जर विमानातून सहा जण प्रवास करत होते तर पाच मृतदेह कसे काय मिळाले? मग सहावी व्यक्ती कोण होती? त्याची बॉडी का मिळाली नाही? सगळे देह जाळून खाक झाले. त्यांची ओळख पटवता येत नव्हती. मात्र त्याचवेळी अजितदादांच्या जवळ असलेले कागद जळालेले नाहीत. दादांसोबत भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का? ते मुंबईतून फाईल बारामतीत सुरक्षित ठेवायला घेऊन चालले होते का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. अजितदादांचा पक्ष आता ‘पटेलां’चा आणि ‘शहा’चा प्रफुल पटेल यांच्या अध्यक्षपदावरून पियुष गोयल यांनी घेतलेल्या ‘यू-टर्न’वर राऊतांनी टोला लगावला. “अजित पवारांचा पक्ष आता पवार किंवा पाटलांचा राहिलेला नाही. अमित शहांनी डाके टाकून तो पक्ष ताब्यात घेतला आणि आता तो पटेल, गोयल, शहा आणि मोदींचा झाला आहे. महाराष्ट्राची प्रादेशिक अस्मिता जपणाऱ्या पक्षाला भाजपने गिळून टाकले आहे,” अशी टीका त्यांनी केली. दादांच्या नावावर कोणतीही बिले फाडू नये अजित पवारांनी फडणवीसांसोबत राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा केली नसेल, याचा अर्थ त्यांचा फडणवीसांवर विश्वास नसेल. त्यांना स्वगृही जायचे असेल, तर फडणवीसांशी चर्चा करण्याची गरज काय? फडणवीसांचा पक्ष हा अखंड महाराष्ट्राच्या विरोधात, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या बाजून आहे. अशावेळी अजित पवारांसारखा नेता या भूमिकेवर काम करू शकणार नाही, हे आम्हाला माहीत आहे, असे संजय राऊत म्हणालेत. अजित पवारांनी आपल्याशी चर्चा का केली नाही? याचे देवेंद्र फडणवीसांनी आत्मचिंतन करावे. इतर शंभर लोक बोलत आहेत ते खोटे आणि फडणवीस बोलायत ते खरे, हे चुकीचे आहे. आज अजित पवार नाहीत, त्यामुळे त्यांच्या नावावर कोणतीही बिले फाडू नयेत, असा टोला संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. महाराष्ट्राचे ओरबाडायचे आणि थातूर-मातूर द्यायचे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काल अर्थसंकल्प फार चवदार लागल्याचा त्यांच्य प्रतिक्रियेवरून दिसून आले. जो महाराष्ट्र देशाच्या तिजोरीत सगळ्यात जास्त भरणा करतो, त्या महाराष्ट्राला अर्थसंकल्पात नक्की काय मिळाले हे मुख्यमंत्र्यांनी आणि केंद्रातील मंत्र्यांनी सांगावे. थातूर मातूर गोष्टी दिल्या असतील अन् तुम्ही या अर्थसंकल्पाचे कौतुक करता, हे धक्कादायक आहे. महाराष्ट्राचे ओरबाडायचे आणि महाराष्ट्रालाच द्यायचे नाही. आज दिल्लीतील शान-ओ-शौकत मुंबई आणि महाराष्ट्राच्या जोरावर आहे. पण अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काय आहे? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. हायस्पीड ट्रेन, बुलेट ट्रेन यांचा महाराष्ट्राला काही उपयोग नाही. हे सगळे तुम्ही गुजरातसाठी करत आहात. महाराष्ट्रातील मराठवाड्यात २०२५ मध्ये २१०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. हे निर्मला सीतारमन यांना माहीत नसेल, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगायला पाहिजे. त्यामुळे अर्थसंकल्पात शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी काय आहे? हे नेहमीचंच आहे. तरीही महाराष्ट्राच्या जनतेला जागृत करण्याचे काम आम्ही करत राहू, असे संजय राऊत म्हणालेत. लोया प्रकरणातही काहीही झाले नव्हते- बन भाजप प्रवक्ते नवनाथ बन म्हणाले, ‘या दुःखामध्ये आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न दुर्दैवाने संजय राऊत यांच्याकडून केला जातोय. त्यांच्या अकलेची कीव येते. जस्टीस लोया प्रकरणात काय झालं सांगतायत, पण जस्टीस लोया प्रकरणातही काहीही झालेलं नव्हतं आणि अजितदादा प्रकरणात जे काही आहे, ते दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. जस्टीस लोया प्रकरणातही काही झालं नव्हतं’ लोयांचा हृदयविकाराने मृत्यू – निकम उज्जव निकम म्हणाले, ‘जस्टील लोया एका लग्न समारंभासाठी नागपूरला गेले. त्यांच्यासमवेत एक जिल्हा सत्र न्यायाधीश बरोबर होते. यांच्याशी मी प्रत्यक्ष बोललो होता. त्यांचा मृत्यू हृदविकाराने झाला होता. अचानक हॉर्ट ॲटॅक आल्याने त्यांचा मृत्यू झाला. परंतु दुर्दैवाने याचे देखील राजकारण केले जाते. ते आपल्या लोकशाहीचे प्रगत चिन्ह म्हणायचे की एखाद्याबद्दल अफवा आणि वावड्या उठवून लोकांना झुलवत ठेवायचे.’
अजितदादांकडे भाजपच्या घोटाळ्याची फाइल होती:संजय राऊत म्हणाले- जस्टीस लोया प्रकरणाची आठवण झाली, लोयांचा हृदयविकाराने मृत्यू, भाजपचे उत्तर
-
By सुरेश पाचभाई
- February 2, 2026
📞 Phone: 9922862184
SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन
न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या,
सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा,
कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या
त्वरित जनतेपर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे.
“घडावा देश, हाच उद्देश… आवाज जनतेचा”
Show Comments (0)
Hide Comments (0)
0
0
votes
Article Rating
Subscribe
Login
0 Comments
Oldest
Newest
Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही:प्रफुल पटेलांची...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 18, 2026
तटकरे-पटेल विलिनीकरणात अडथळा आणत आहेत का?:सुप्रिया सुळेंचे...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 18, 2026
केवळ निवडणुकीपुरते सक्रिय होता का?:राजकीय नेत्यांना पाठिंबा...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 18, 2026
पर्यायी सांस्कृतिक राजकारण उभे करावे लागेल:15 व्या...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 18, 2026
रोहित पवारांच्या घातपाताच्या शक्यतेमागे नेमके तर्क काय?:केंद्रीय...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 18, 2026
राहुल गांधींची धास्ती सरकारला नाही, काँग्रेसलाच:राऊतांनी इंडिया...
3views
0likes
-
By सुरेश पाचभाई
- February 18, 2026
