ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

अत्याचाराच्या ठिकाणी SIT ची छापा टाकत कारवाई:ऑफिस सील, मोठे पुरावे हाती येण्याची शक्यता; शटर उघडलं आणि उघडकीस आलं सत्य

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपास वेग घेत असताना आता विशेष तपास पथक थेट त्या ठिकाणी पोहोचलं आहे, जिथे महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप आहेत. खरातच्या ओकस कार्यालयात आज SIT ने सखोल तपासणी सुरू केली. शटर उघडताच तपास पथकाने आत प्रवेश केला आणि संपूर्ण परिसराची बारकाईने पाहणी करण्यात आली. या ठिकाणीच अनेक महिलांचे शोषण झाल्याचा आरोप असल्याने या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, न्यायालयाने अशोक खरात याला 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून त्याची चौकशी सुरू आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली अनेक महिलांची फसवणूक आणि अत्याचार केल्याच्या आरोपांमुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर बनले आहे. गेल्या काही दिवसांत तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून, आता या कार्यालयातून महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. SIT पथकाने कार्यालयात सापडलेल्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. या ठिकाणी विविध फाईल्स, नोंदी आणि इतर साहित्य आढळून आले असून त्यातून मोठे धागेदोरे मिळू शकतात, असा अंदाज आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर हे कार्यालय अधिकृतपणे सील करण्यात आले आहे. या कारवाईमुळे खरातच्या कारभाराचा अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे. शिवनिका संस्थेचे बँक खाते सील तपासाच्या पुढील टप्प्यात आर्थिक व्यवहारांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. खरातच्या ‘शिवनिका’ संस्थेचे बँक खाते सील करण्यात आले असून, त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या मालमत्तांची माहिती गोळा केली जात आहे. जमीन, घर, दुकाने अशा विविध मालमत्तांची चौकशी सुरू असून, त्यासाठी नोंदणी विभागाकडून राज्यभरात तपास सुरू आहे. धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता या प्रकरणात कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरातने एवढी मोठी संपत्ती कशी उभी केली आणि त्यामागे पैसा कुठून आला, याचा तपास सध्या सुरू आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत या तपासाला आणखी वेग येण्याची शक्यता असून, आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर