ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

अंदुरा फाट्याजवळ भीषण ‎अपघात:अपघातात दोन युवकांचा ‎‎जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अकोट- शेगाव मार्गावरील अंदुरा ‎‎फाट्याजवळ रस्त्यावर पडलेल्या‎मोठ्या भेगांमुळे झालेल्या भीषण ‎‎अपघातात अकोट येथील दोन युवकांचा ‎‎जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ‎‎रविवारी दुपारी घडली. जिल्ह्यातील ‎निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांचा मुद्दा‎यानिमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे.‎ मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल‎राजेश भोरे (२२) व श्रीकांत पुरुषोत्तम ‎‎बायस्कर (२२) हे दोघे युवक अकोट ‎‎शहरातील श्रीहरी हॉटेलच्या मागील ‎‎परिसरात राहणारे होते. ते शेगाव येथे‎दर्शन करून दुचाकीने अकोटकडे परत‎येत होते. दरम्यान अकोट-शेगाव ‎‎मार्गावरील अंदुरा फाट्याजवळ त्यांच्या ‎‎दुचाकीचा भीषण अपघात झाला.‎घटनेची माहिती मिळताच उरळ पोलिस ‎‎ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी‎तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ‎‎पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह‎ताब्यात घेतले व पुढील कार्यवाहीसाठी ‎‎अकोट ग्रामीण रुग्णालयात पाठवले.‎दोन्ही युवकांचे शवविच्छेदन अकोट‎ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.‎दरम्यान, या घटनेमुळे अकोट शहरात‎शोककळा पसरली आहे. सराफा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎व्यावसायिक असलेले राजू भोरे यांना‎एक मुलगा व मुलगी आहे. कुणाल हा‎मोठा मुलगा होता. तर पुरुषोत्तम‎बायस्कर यांना दोन मुले असून श्रीकांत‎हा धाकटा मुलगा होता.‎ अॅनालिसिस‎: बसखाली आल्याने दुखापत‎‎
प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या ‎माहितीनुसार, रस्त्यावर अनेक ठिकाणी‎मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत. याच‎भेगांमधून दुचाकी घसरल्याने‎वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी‎अकोटहून संभाजीनगरकडे जात‎असलेली चांदूरबाजार आगाराची एस. टी.‎बस समोरून येत होती. दुचाकीस्वार‎बसच्या चाकाखाली आल्याने दोघांच्या‎डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघात‎इतका भीषण होता की दोघांचाही‎घटनास्थळीच मृत्यू झाला.‎‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर