ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

वरिष्ठ सभागृहात शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आवाज उठवणार:आमदार विवेक कोल्हे; भव्य नागरी सत्काराचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


प्रतिनिधी | कोपरगाव शेतमालाला योग्य दर आणि बाजारभाव मिळाला पाहिजे, हीच आमची मुख्य भूमिका आहे. विधान परिषदेच्या माध्यमातून वरिष्ठ सभागृहात शेतकरी हितासाठी सरकारकडे आग्रही राहणारा आणि युवकांचा हक्काचा प्रतिनिधी म्हणून मी काम करणार आहे. तुमच्या न्याय आणि हक्कासाठी आवाज उठवणारा तुमच्या घरातील व्यक्तीच आता विधान परिषदेमध्ये गेला आहे, असे प्रतिपादन आमदार विवेक कोल्हे यांनी केले. सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे आमदार कोल्हे यांच्या भव्य नागरी सत्काराचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला, त्याप्रसंगी सत्कारमूर्ती म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार राजाभाऊ वाजे हे होते. पाथरे ग्रामस्थांच्या वतीने आमदार कोल्हे यांची वाजतगाजत मिरवणूक काढून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. आमदार कोल्हे म्हणाले, या आमदारकीचा सातबारा जरी माझ्या नावावर असला, तरी या सातबाराच्या पोटहिश्शात माझ्या प्रत्येक कष्टकरी कार्यकर्त्याचा समान हिस्सा आहे. कोल्हे कुटुंबीय आणि पाथरे पंचक्रोशीच्या जुन्या आठवणींना उजाळा देत ते म्हणाले, “संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीच्या काळापासून या भागातील अनेक सभासद, कर्मचारी आणि शेतकरी केवळ ‘तीन रुपये हजेरी’ प्रमाणे कामाला येत होते. त्या काळापासून सुरू झालेला हा जिव्हाळा आज आमच्या तिसऱ्या पिढीपर्यंत पोहोचला आहे. अनेक ज्येष्ठ सहकाऱ्यांनी स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांसोबत खांद्याला खांदा लावून कार्य केले आहे. पूर्वी हा भाग दुष्काळी म्हणून ओळखला जात होता, मात्र कोल्हे साहेबांच्या दूरदृष्टीमुळे या भागाचे चित्र बदलले. हा जिव्हाळा मी पुढेही असाच जपून ठेवेन. या सोहळ्याला भाजपचे नेते भारत कोकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र चव्हाणके, माजी पंचायत समिती सभापती बाळासाहेब वाघ, माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विठ्ठलराजे भोसले, राजेश गडाख, प्रणव पवार, अंबादास कदम उपस्थित होते. प्रास्ताविक जालिंदर थोरात यांनी, सूत्रसंचालन मनोज गवळी यांनी, तर आभार कृष्णा घुमरे यांनी मानले. विधान परिषदेचे आमदार विवेक कोल्हे यांचा पाथरे येथे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर