ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

‘माझे आणि मैत्रिणींचे विवस्त्र फोटो माझ्या टॅबमध्ये’:भोंदू रवींद्र एरंडेचा दावा; DVDमध्ये आढळून आले 100 आक्षेपार्ह व्हिडिओ

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिकचा दूसरा भोंदू रवींद्र एरंडेच्या प्रकरणात देखील रोज नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. आता एरंडेने त्याच्या टॅबमध्ये असलेल्या आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओबाबत पोलिसांसमोर धक्कादायक माहिती दिली आहे. माझ्या मैत्रिणींसोबतचे विवस्त्र खासगी फोटो व व्हिडिओ टॅबमध्ये असल्याचे सांगितले आहे. तसेच त्याने खंडणीच्या फिर्यादीतही त्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे हे फोटो आणि व्हिडिओ साठवून लैंगिक शोषण किंवा खंडणी उकळण्याचा प्रयत्न एरंडे करत होता का? असा तपास पोलिसांकडून केला जात आहे. भोंदू अशोक खरातच्या पावलावर पाऊल ठेवत महिलांना विविध आमिषे दाखवून फसवणूक करणाऱ्या रवींद्र एरंडेचे काळे कारनामे उघड झाले असून, त्याच्या कार्यालयातून पोलिसांनी सापाची कात, पक्ष्यांचे अवयव आणि कवड्यांसारखे साहित्य जप्त केले आहे. स्वतःवरील लैंगिक अत्याचाराचे आरोप लपवण्यासाठी एरंडेने आक्षेपार्ह व्हिडिओच्या नावाखाली खंडणी उकळली जात असल्याचा बनाव रचला होता. मात्र त्याच्याच ऑफिस बॉयने रचलेल्या सापळ्यामुळे त्याचे बिंग फुटले. सातपूर पोलिसांनी एरंडेला लैंगिक अत्याचार आणि ॲट्रोसिटीच्या गुन्ह्याखाली बेड्या ठोकल्या असून, सत्र न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत 10 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. आपल्या मालकाच्या अनैतिक कृत्यांचा भांडाफोड करत ऑफिस बॉयने 12 लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता आणि एरंडेच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधितांना अटकही केली होती. मात्र ही तक्रार दाखल करतानाच एरंडेने स्वतःच्या कृत्यांची एकप्रकारे कबुली दिली. मैत्रिणीसोबतचे विवस्त्र खासगी फोटो व व्हिडीओ असलेला टॅब ऑफिसमध्ये ठेवला होता, असा उल्लेख त्याने फिर्यादीत केल्याने त्याचे गुपित उघड झाले आणि तपासादरम्यान पोलिसांनी जप्त केलेल्या डीव्हीडीमध्ये त्याचे तब्बल 100 आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ आढळून आले आहेत. संशयित रवींद्र एरंडे हा वन्यजीवांचे अवयव आणि जादूटोण्याची भीती दाखवून, तसेच नोकरी-व्यवसायाचे आमिष देऊन गरजूंना शोषत असल्याचा संशय ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने व्यक्त केला आहे. याप्रकरणी ‘अंनिस’ने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देऊन एरंडेची सखोल चौकशी करण्याची आणि त्याच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यासह वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर