ब्रेकिंग न्यूज
महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना…
SP News Maregaon

सांगोल्यात शहाजी बापूंचे एकदम ओक्के!:सत्ताधारी शिवसेनेचे 15 उमेदवार विजयी, नगराध्यक्षपदही खिशात; भाजप – शेकापची दाणादाण

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगरपंचायतीच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचा उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आला आहे. या ठिकाणी भाजपने शेकापशी युती करून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पण अखेर मतदारांनी शिवसेनेला कौल देऊन आपला निकाल स्पष्ट केला आहे. सांगोला नगरपंचायतीची निवडणूक राज्यभरात चांगलीच गाजली होती. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील विरुद्ध भाजप – शेकाप व माजी आमदार दीपक साळुंखे युती असा दुरंगी सामना झाला होता. भाजपच मंत्री जयकुमार गोरे यांनी या ठिकाणी शिंदे गटाची कोंडी करत शहाजीबापूंना एकटे पाडण्याचा प्रयत्न केला. स्वतः शहाजीबापूंनीही ही गोष्ट जाहीरपणे बोलून दाखवली होती. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात त्यांच्या प्रचार कार्यालयावरही छापेमारी करण्यात आली होती. यामुळे ते अधिकच चिडले होते. त्यांनी त्याचे जोरदार भांडवल केले. अखेर आज झालेल्या मतमोजणीत त्यांच्या शिवसेनेला चांगल्या जागा मिळाल्या. शिवसेनेचे 23 पैकी 15 उमेदवार विजयी सांगोला नगरपंचायतीच्या निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणीत शिवसेनेचे 23 पैकी 15 उमेदवार विजयी झालेत. याशिवाय नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदा माने यांनीही विजय मिळवला आहे. दुसरीकडे, शेकापचे 3, भाजपचे 4 व दीपक साळुंखे यांच्या गटाचा 1 उमेदवार विजयी झाला आहे. शहाजीबापूंनी या विजयावर आनंद व्यक्त करत सांगोल्याचा मतदार स्वाभिमानाने वागल्याची प्रतिक्रिया दिली आहे. शहाजीबापूंनी निकालावर व्यक्त केला आनंद शहाजीबापू म्हणाले, सांगोला शहरातील मतदारांचा मला गर्व व अभिमान वाटत आहे. सांगोला तालुक्याची वैचारिक बांधणी मी व स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी केली. विरोधकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत केलेली युती सांगोल्याच्या मतदारांना आवडली नाही हे निकालावरून दिसून येते. सांगोल्यात सर्वच पक्ष विरोधात होते. पण शिवसेना व रिपब्लिकन पक्षाची युती झाली होती. राजकारणात सध्या सुरू असलेले वेडेवाकडे वागणे सांगल्याच्या जनतेने अमान्य केले. त्यांनी शिवसेनेला भरघोस मतदान केले. नगरपालिका निवडणुकीत मला एकटे पाडण्यात आले. पण मला जनतेने साथ दिल्याचे निकालातून स्पष्ट होते. आपल्यासोबत सर्वसामान्य जनता असल्याची बाब मला प्रचारावेळी जाणवले होते. त्यामुळे आमचे उमेदवार सर्वाधिक मतांनी विजयी झाले. भाजपने शिवसेनेला विश्वासात घेऊन नगरपालिकेची निवडणूक लढवण्याची गरज होती. कारण, सोलापूर जिल्ह्यात शिवसेना कधीच चुकीचे वागचली नव्हती. शिवसेना भाजपच्या खांद्याला खांदा लावून काम करत होती. पण आम्हाला विचारात न घेता भाजपने ही निवडणूक लढवली. त्यामुळे त्यांना जिल्ह्यात धक्का बसला, असे पाटील म्हणाले. जनतेला कुटील कारस्थानांना मान्यता देत नाही आज निकाल ऐकताना एवढेच वाटते की, राजकारणात खूप कुटील कारस्थाने केली जातात. पण जनता त्याला मान्यता देत नाही. एकनाथ शिंदेंनी या शहराच्या विकासासाठी तब्बल 200 कोटींचा निधी दिला. त्यामुळे पुढील कालखंडात आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार सांगोल्याचा चेहरामोहरा बदलून टाकू, अशी भावनाही शहाजी बापू पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. उल्लेखनीय बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभाही सांगोल्यात झाल्या होत्या. त्यात आरोप – प्रत्यारोप जोरदार झाले होते. सुरुवातीला भाजप व शेकापची बाजू मजबूत दिसत होती. पण प्रत्यक्ष प्रचारात शहाजीबापू पाटील यांनी आघाडी घेतली होती.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर