ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

श्रीरामपूर-बेलापूर नव्या रस्त्यासाठी झाडांचा बळी:वृक्षप्रेमींमध्ये संताप, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नवीन रोपांचीही राखरांगोळी

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


झाड आणि रस्ता यांचे नाते नेहमीच विळ्या-भोपळ्याचे राहिले आहे. अरुंद रस्ता, वाढती वाहतूक आणि अपघातांचे सत्र यामुळे श्रीरामपूर-बेलापूर राज्य मार्ग क्रमांक ३६ या ६ किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरण करणे आवश्यक होते. मात्र, हा विकास साधताना वडाच्या झाडांसह इतर शेकडो जुन्या झाडांवर कुऱ्हाड चालवली गेली. वृक्षप्रेमींच्या तीव्र आंदोलनानंतर प्रशासनाने रस्त्याच्या दुतर्फा आणि दुभाजकांमध्ये नवीन झाडे लावली , मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या रखरखत्या उन्हात लाखो रुपये खर्चून लावलेल्या झाडांची ‘राखरांगोळी’ झाली आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींमधून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. रस्ता रुंदीकरण, शहरीकरण आणि औद्योगिकीकरणात पर्यावरण रक्षणाचे महत्त्व वाढले आहे. पर्यावरण आणि विकास हे परस्परांना विरोधी नसून पूरक आहेत. मात्र, झाडे तोडण्यास विरोध करणाऱ्यांवर ‘विकासविरोधी’ असा शिक्का मारला जातो. पावसाळ्याच्या सुरुवातीला वृक्षारोपणाच्या मोहिमांचे पीक येते, पण त्यात ‘चमकोगिरी’ जास्त आणि संवर्धन कमी, अशीच काहीशी स्थिती येथे पाहायला मिळत आहे. रस्त्याच्या दुभाजकावर झाडे लावण्याचे शास्त्रीय कारण म्हणजे, समोरून येणाऱ्या वाहनांच्या हेडलाईटचा प्रखर झोत या झाडांमुळे कापला जातो, ज्यामुळे अपघात टळतात. तसेच वाहनांचा धूर आणि धूळ शोषून घेण्याचे काम ही झाडे करतात. मात्र, या रस्त्यावर लावलेली झाडे पाण्याअभावी जळून खाक झाली आहेत. तोडलेल्या झाडांच्या बदल्यात प्रशासनाने नक्की किती झाडे लावली आणि किती जगवली? याचे उत्तर आज कोणाकडेही नाही. स्त्याचे काम पूर्ण झाल्यावर दुतर्फा व दुभाजकावर झाडे लावण्यात आली, मात्र त्यांना पाणी घालून जगवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? पाण्याअभावी लाखो रुपयांची रोपे जळून खाक झाल्याने शासनाचा पैसा पाण्यात गेला आहे. या नुकसानीला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल वृक्षप्रेमी कर त आहेत. दुप्पट झाडे लावण्याचे आश्वासन हवेतच अमित मुथा यांच्यासह अनेक वृक्षप्रेमींनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले होते. त्यावर मे २०२१ मध्ये विभागाने लेखी पत्र देऊन अत्यावश्यक झाडेच काढली जातील, मोठी झाडे वाचवू आणि जेवढी झाडे तोडू त्याच्या दुप्पट लावू, असे आश्वासन दिले होते. मात्र, आजतागायत या आश्वासनाची कोणतीही प्रामाणिक अंमलबजावणी झालेली नाही. पूर्वी या महामार्गावरून प्रवास करताना वडाच्या झाडांची दाट सावली मिळायची. भौतिक विकासाच्या नावाखाली निसर्गाकडे डोळेझाक झाल्याने आता झाडांची जागा गाड्यांमधील वातानुकूलित यंत्रणेने घेतली आहे. आता नागरिकांनीच लोकचळवळ उभारण्याची गरज आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर