ब्रेकिंग न्यूज
⚡ पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बसवर काळाचा घाला, थेट पूलावरून खाली कोसळली गाडी, 21 हून अधिक प्रवासी बसमध्ये ✦ ⚡ News18 Marathi Headlines | 13 NOV | 9 AM | Sanjay Shirsat News | NCP Merger | Shiv Sena | Fadnavis ✦ ⚡ अवघ्या 10 हजारांची गुंतवणूक करेल मालामाल, मधमाशी पालनाचा दुहेरी फायदा, शेतकऱ्यांनी काय करावं? Video ✦ ⚡ Pune News: फटाक्यांवरून मध्यरात्री पुण्यात राडा, वडिलांना वाचवायला गेलेल्या लेकीसोबतच भयंकर घडलं, क्षणात रक… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ कटिंग चहा देखील महाग होणार! मदर डेअरीपाठोपाठ 2 कंपन्यांनी वाढवले दुधाचे दर, नवे दर आजपासून लागू ✦ ⚡ Cricket Rule : ना कॅच, ना रन आऊट, ना बोल्ड… अंपायरने भलत्याच कारणासाठी दिलं आऊट, क्रिकेटमधली सगळ्यात विचि… ✦ ⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह…
SP News Maregaon

नीच कृत्य करणाऱ्यांना जात-धर्म नसतो:खरात अन् एरंडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का? लव्ह जिहाद’ सर्वांना लागू करा- संजय राऊत

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिकमधील खरात बाबा काय मुस्लीम होता का? ऐंरडे काय मुस्लीम होते का? मौला, पादरी होते का? नीच कृत्य करणाऱ्यांना जात धर्म नसतो. खरात बाबा हिंदू आहे, एरंडे हिंदू आहेत म्हणून हिंदू संघटना नरमाईची भूमिका घेणार आणि इतर धर्मांचे कुणी सापडल्यावर रस्त्यावर येणार हे चालणार नाही, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमधील आयटी कंपनीत सुरू असलेल्या आयटी जिहादबद्दल बोलताना म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, लव्ह जिहाद हा शब्द सर्वांना लागू झाला पाहिजे. महिलांचे शोषण करणाऱ्यांना हा शब्द लागू पडतो. मोदी संसदेत महिलांच्या न्याय हक्कासाठी बिल आणताय पण त्यांना कोणीतरी सांगितले पाहिजे असे हक्क देणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी महिलांना असे हक्क दिले होते. याचे श्रेय महाराष्ट्राला जाते. अशा राज्यात बुआ उदयाला येत आहेत ते सर्व भाजपचे प्रचारक आहेत. याचा भाजपशी संबंध आहे त्यावर बोलले पाहिजे. FIR बद्दल मागणी सुनेत्रा पवारांनी करायला हवी संजय राऊत म्हणाले की, अजित पवार यांच्या अपघतासंदर्भात महाराष्ट्रात FIR दाखल करा ही रोहित पवार यांची मागणी आहे. तीच मागणी हर्षवर्धन सपकाळ आणि आकाश मोरे करत आहेत. स्वत: मुख्यमंत्री सांगताय की अजित पवार यांच्या अपघाताबद्दल खोलपर्यंत जात तपास करू. त्यासाठी FIR नोंदवावा लागेल. विमान कंपनीवर गुन्हा दाखल करायला तुम्ही तयार नाहीत मग या प्रकरणी तुम्ही सखोल तपास कसा करणार? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. खरंतर ही मागणी सुनेत्रा पवार यांनी करायला पाहिजे. अजित पवारांच्या दोन्ही मुलांनी केली पाहिजे. पण ती मागणी रोहित पवार, काँग्रेस, आकाश मोरे आणि आम्ही सर्व जण करत आहोत. मोरे यांच्या मागणीचा विचार झाला तर उपकार होतील. कर नाही त्याला डर कशाला? असा सवाल राऊत यांनी केला आहे. यामध्ये मोठ्या भावाचा हात आहे का? संजय राऊत म्हणाले की, भाजपकडून विरोधकांवर धडाधड गुन्हे दाखल केले जातात, पण त्यांचा जवळचा सहकारी राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचा जीवाभावाचा सहकाऱ्यांच्या मृत्यू संदर्भात गुन्हा का दाखल केला जात नाही. लहान भावाचा मृत्यू कसा झाला याचा तपास झाला पाहिजे की यामध्ये मोठ्या भावाचा हात आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यावर सर्वांचे एक मत होईल. पण जी मागणी आहे, FIR करा ती का सोडत आहेत. निवडणूक एक निमित्त आहे ही संधी आहे गुन्हा दाखल करूण घेण्याची. सुनेत्रा पवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील हे सांगायला कोणाची गरज नाही. पार्थ पवारांना अभ्यास करावा लागेल संजय राऊत म्हणाले की, पार्थ पवार यांना अभ्यास करावा लागेल. त्यांनी आजोबांकडून काही धडे घेतले पाहिजे. त्यांच्या वडीलांचा इतिहास त्यांनी चाळला पाहिजे. त्यांना राजकारणाची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, त्यांनी त्या पद्धतीने काम केले पाहिजे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर