ब्रेकिंग न्यूज
Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं महायुती सरकारची मोठी घोषणा, तब्बल 30209 जागांसाठी जम्बो शिक्षक भरती, असा करा अर्ज! मोबाईलवर तो मेसेज आला अन् तिथंच बिझनेसमन फसला, छ. संभाजीनगरात अडीच तासांचा थरार, शेवटी… पोलीस भरतीचं स्वप्न अधूरंच राहिलं, धावण्याचा सराव करताना खाली कोसळला अन् घेतला शेवटचा श्वास शफीकचं शतक, साजिदची घातक बॉलिंग, पाकिस्तानचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय, WTC टेबलही हललं! एल निनोच्या पार्श्वभूमीवर मारेगाव तालुक्यात शेततळ्यांची वाटचाल द्राक्षाने बुडवलं, डाळिंबाने केलं मालामाल! शेतात असं टेक्निक वापरून सोलापूरच्या शेतकऱ्याने कमावले 42 लाख! Solapur: माझे फॉलोअर्स का कमी केले? इन्स्टा रिल्सवरून बिनसलं, तरुणासोबत भयंकर…, ‘त्या’ दाव्याने पोलिसही च…
SP News Maregaon

सोलापुरात भाजपचा एकतर्फी विजय:”एवढी खुमखुमी होती तर घरचाच उमेदवार द्यायचा होता”, राजेंद्र राऊतांचा अप्रत्यक्ष टोला

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी एकतर्फी विजय मिळवत विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) समर्थित उमेदवार वसंतराव देशमुख यांचा तब्बल 365 मतांनी पराभव केला. विजयानंतर राजेंद्र राऊत यांनी नाव न घेता मोहिते-पाटील गटावर जोरदार टीका करत निवडणूक लढवण्यामागे काही नेत्यांचा “इगो” कारणीभूत असल्याचा दावा केला. 483 मते मिळवत राजेंद्र राऊत विजयी मतमोजणीनंतर जाहीर झालेल्या निकालानुसार भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना 483 मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार वसंतराव देशमुख यांना केवळ 118 मतांवर समाधान मानावे लागले. या निकालासह भाजपने सोलापुरातील आपले संघटनात्मक वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केल्याचे मानले जात आहे. “निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न होता” विजयानंतर माध्यमांशी बोलताना राजेंद्र राऊत यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न झाल्याचा दावा केला. मात्र, काही नेत्यांच्या अहंकारामुळे निवडणूक लढवावी लागल्याचे त्यांनी सांगितले. “ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. पण काही लोकांच्या इगोमुळे निवडणूक लागली. ‘इतका इगो आणि मुझे गिनो’ अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली,” असे राऊत म्हणाले. मोहिते-पाटलांवर अप्रत्यक्ष टीका राजेंद्र राऊत यांनी कुणाचेही नाव न घेता मोहिते-पाटील गटावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, वसंतराव देशमुख यांना पुढे करून काही जणांनी स्वतःची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. “एवढी खुमखुमी होती तर स्वतःच्या घरातील उमेदवार मैदानात उतरवायला हवा होता. वसंतराव देशमुखांना 118 मते मिळाली. घरातील उमेदवार उभा केला असता तर कदाचित एवढी मतेही मिळाली नसती,” असा टोला त्यांनी लगावला. “कार्यकर्त्याला बळीचा बकरा बनवलं” राऊत यांनी पुढे आरोप केला की, काही नेत्यांच्या राजकीय अहंकारामुळे एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळीचा बकरा बनवण्यात आले. “स्वतःच्या इगोमुळे एका कार्यकर्त्याला निवडणुकीत पुढे करण्यात आले. निकालाने जनतेने आणि मतदारांनी योग्य उत्तर दिले आहे,” असेही ते म्हणाले. या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी अधिवेशनानंतर अकलूज येथे भव्य विजयी सभा घेणार असल्याची घोषणाही राजेंद्र राऊत यांनी केली. या सभेत कार्यकर्त्यांचे आभार मानणार असल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीसाठी सोलापुरातून सकारात्मक संदेश राज्यातील विधान परिषद निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्या असताना सोलापुरात भाजपने मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यामुळे महायुतीसाठी हा निकाल उत्साहवर्धक मानला जात आहे. दुसरीकडे, वसंतराव देशमुख यांना अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी मते मिळाल्याने महाविकास आघाडीच्या स्थानिक संघटनात्मक ताकदीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः मतदारसंघातील राजकीय समीकरणे आणि मोहिते-पाटील गटाच्या प्रभावाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. सोलापूरच्या निकालानंतर आता राजेंद्र राऊत यांच्या टीकेला मोहिते-पाटील गटाकडून काय उत्तर दिले जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विधान परिषदेच्या 17 जागांचा निकाल 1) छत्रपती संभाजीनगर-जालना- सुहास शिरसाट- भाजप 2) धाराशिव-लातूर- बीड- बसवराज पाटील, भाजप 3) नांदेड- अमर राजूरकर, भाजप 4) सोलापूर- राजेंद्र राऊत, भाजप 5) नागपूर- राजीव पोतदार, भाजप 6) भंडारा- गोंदिया- अविनाश ब्राह्मणकर, भाजप 7) अमरावती- प्रवीण पोटे, भाजप 8) जळगाव- नंदकिशोर महाजन, भाजप 9) सांगली- सातारा- धैर्यशील कदम, भाजप 10) परभणी- हिंगोली- सईद खान, शिवसेना 11) नाशिक- गोकुळ गिते, (अपक्ष) भाजपचे बंडखोर उमेदवार सहा उमेदवार बिनविरोध 12) ठाणे – रवींद्र फाटक – शिवसेना, (बिनविरोध) 13) यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी – शिवसेना, (बिनविरोध) 14) रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे – राष्ट्रवादी काँग्रेस, (बिनविरोध) 15) पुणे – विक्रम काकडे – राष्ट्रवादी काँग्रेस, (बिनविरोध) 16) वर्धा – गडचिरोली – चंद्रपूर – अरुण लखाणी – भाजप, (बिनविरोध) 17) अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे – भाजप, (बिनविरोध) संबंधित बातमी वाचा… विधान परिषद निवडणूक निकाल:महायुतीचा 16 जागांवर विजय, नाशिकमध्ये गोकुळ गितेंचा शिवसेनेला धक्का; महाविकास आघाडीचा सुपडा साफ महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा संपूर्ण निकाल अखेर जाहीर झाला आहे. १८ जून रोजी पार पडलेल्या या निवडणुकीत महायुतीने आपला वरचष्मा कायम राखत १७ पैकी तब्बल १६ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र, नाशिकच्या जागेवर महायुतीला मोठा धक्का बसला असून, तिथे अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी महायुती आणि शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव केलाय. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. वाचा संपूर्ण बातमी नाशिकमध्ये महायुतीला दणका! गोकुळ गीतेंचा दणदणीत विजय:क्रॉस व्होटिंगची चर्चा, दराडेंचा संताप, राऊत-महाजन आमनेसामने नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर झाला असून महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. भाजपमधून बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी कायम ठेवणारे गोकुळ गिते यांनी पहिल्याच फेरीत विजयाचा कोटा पार करत दणदणीत विजय मिळवला. या निकालामुळे महायुतीत खळबळ उडाली असून क्रॉस व्होटिंग, अंतर्गत नाराजी आणि विश्वासघाताच्या चर्चांना उधाण आले आहे. वाचा संपूर्ण बातमी

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर