ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

उमेदवार शक्तिप्रदर्शन करत आला, पण अर्जच विसरला:मुंबईत एका पक्षाच्या उमेदवारासोबत घडला विचित्र प्रसंग; कार्यकर्तेही हैरान

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यात येत्या 15 जानेवारीला मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकांचा फड रंगणार आहे. आज उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी इच्छुक व पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची पळापळ सुरू झाली आहे. त्यातच मुंबईतील एका पक्षाच्या उमेदवारासोबत एक विचित्र प्रसंग घडला आहे. हा उमेदवार आपल्या समर्थकांसह वाजंत्री घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक कार्यालयात पोहोचला. पण ऐनवेळी उमेदवारी अर्जच आपण आणला नसल्याची बाब त्याच्या लक्षात आली. यामुळे हसावे की रडावे असा प्रश्न त्याच्यापुढे उभा राहिला. यासंबंधीच्या माहितीनुसार, उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आज शेवटच्या दिवशी मुलुंड, भांडुप व विक्रोळी परिसरात चांगलाच रंग चढला. टी आणि एस वॉर्डाच्या निवडणूक कार्यालयांबाहेर उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरण्यास सुरुवात केली. या गदारोळात एका पक्षाचा उमेदवार शक्तिप्रदर्शन करत निवडणूक कार्यालयात पोहोचला. पण तो फॉर्मच विसरल्याने कार्यकर्त्यांत काही काळ हास्याचा फवारा उडाला. नेमका काय घडला प्रसंग? त्याचे झाले असे की, एका पक्षाचा उमेदवार गोवंडी, मानखुर्द, भांडुप, सोनापूर येथील कार्यकर्त्यांना घेऊन शक्तिप्रदर्शन करत गाड्यांचा ताफा घेऊन टी वॉर्डच्या कालिदास येथील निवडणूक कार्यालयाबाहेर पोहोचला. यावेळी पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवत त्याला मोजक्याच कार्यकर्त्यांसह आत जाण्याची परवानगी दिली. आत जाण्यापूर्वी त्याने आपल्या सहकाऱ्यांना अरे फॉर्म कुठाय? असा प्रश्न केला. त्यावर कार्यकर्ते एकमेकांकडे पाहत राहिले. त्यांचा गोंधळ उडाला. अखेर चौकशीअंती उमेदवारी अर्ज घेऊन येणारा कार्यकर्ता गर्दीत मागेच राहिल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. यामुळे उमेदवाराची चांगलीच गोची झाली. कार्यालयाबाहेर थांबलेले त्यांचे समर्थक दादा, आत का जात नाहीत? असा प्रश्न करत होते. पण तेवढ्यात कुणीतरी काही नाही, अर्ज विसरलेत, असे त्यांना सांगितले. हे ऐकताच अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्यानंतर 10-15 मिनिटांनी अर्ज असलेला कार्यकर्ता धापा टाकत निवडणूक कार्यालयात पोहोचला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. अखेर उमेदवार आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह अर्जाची फाईल घेऊन निवडणूक कार्यालयात दाखल झाला आणि आपला अर्ज भरला. नील समोय्या प्रभाग क्रमांक 107 मधून रिंगणात दुसरीकडे, भाजप नेते किरीट सोमय्या यांचे सुपुत्र नील सोमय्या यांनी मुंलुंडच्या प्रभाग क्रमांक 107 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. यापूर्वी ते प्रभाग क्रमांक 108 चे नगरसेवक होते. यावेळी भाजपने त्यांना 107 मधून संधी दिली. भाजप उमेदवार प्रभाकर शिंदे, अनिता वैती यांनीही यावेळी आपला उमेदवारी अर्ज भरला. हे ही वाचा… संभाजीनगर, नाशिक, पुणे, मालेगावात युती तुटली:भाजप, शिवसेना अन् राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढणार; शेवटपर्यंत चर्चा ताणल्याचा परिणाम
मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिकांसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. त्यातच सत्ताधारी महायुतीमधील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या 3 घटकपक्षांची युती अनेक ठिकाणी तुटल्यामुळे हे पक्ष आता आपापल्या वाटांनी वेगळे जाणार हे स्पष्ट झाले आहे. युती तुटलेल्या शहरांत छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे व मालेगावसह इतर काही ठिकाणचा समावेश आहे. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर