ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

सुनेत्रा पवारांनी दोनदा फोन करून बिनविरोधसाठी विनंती केली:देवेंद्र फडणवीस म्हणजे झारीतले शुक्राचार्य, निवडणूक लढायला आम्ही सक्षम- हर्षवर्धन सपकाळ

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांनी दोन वेळा फोन करत संपर्क साधला आणि बिनविरोध निवडणुकीची विनंती केली, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. आपण सभ्यतेने वाटचाल केली पाहिजे असे या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रयत्न करतो आहोत. आमची भूमिका ही सर्वांना माहिती आहे. सत्ताधाऱ्यांनी तसा प्रतिसाद दिलेला नाही. बारामती निवडणूक लढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, पण जी विनंती सुरू आहे, त्यासाठी आम्ही चर्चा करतो आहोत. बारामतीमध्ये काँग्रेस संदर्भात बोटं दाखवणे चुकीचे तिथे 53 अर्ज दाखल झाले आहेत. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राष्ट्रवादीअजित पवार गटातील नेत्यांनी या निवडणुकीसंदर्भात आमच्याशी संपर्क इतक्यादिवस का साधला नाही. त्यांच्या पक्षातील नेत्यांना या निवडणुकीसंदर्भात काही देणं घेणं नव्हते का? असा सवाल सपकाळ यांनी केला आहे. इतके दिवस त्यांनी संवाद का साधला नाही. पक्षश्रेष्ठींना का संवाद साधला नाही. भाजपकडे सगळी सुत्रे सोपवली होती का? असा प्रश्न निर्माण होतो. पार्थ पवारांचे वक्तव्य हे निराधार हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, बारामतीसाठी आम्ही अर्ज दाखल केलेला आहे. काँग्रेसच्या सर्व नेत्यांशी चर्चा करत आम्ही पुढची भूमिका घेऊ. सुनेत्रा पवारांशिवाय आणखी कोणीही आमच्या नेत्यांशी किंवा काँग्रेसशी संपर्क केलेला नाही. पार्थ पवारांचे वक्तव्य हे निराधार आहे. त्यांच्या वाक्यासंदर्भात त्यांना कधीतरी पश्चताप होईल. अजित पवार यांचे पुत्र असल्याने त्यांनी भान राखले पाहिजे. सरकारचे वाभाडे निघण्याचा प्रकार हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, बारामती पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात आम्ही जी अट ठेवली आहे ती काय चुकीची नाही. अजित पवार अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झाला तर काँग्रेसचे आकाश मोरे उमेदवारी अर्ज मागे घेणार ही त्यांची भूमिका आजपण कायम आहे. हे होत असताना गुन्हा दाखल करावा ही मागणी करावी लागते. पोलिस स्टेशनमध्ये जात बसावे लागते तिथे पोलिसांशी हुज्जत घालावी लागते. महाराष्ट्रात गुन्हा दाखल होत नाही म्हणून तो कर्नाटकात दाखल करावा लागतो. हे सर्व सरकारचे वाभाडे निघण्याचा प्रकार आहे. फडणवीस गुन्हा नोंदवू देत नाही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात गुन्हा नोंदवू देत नाही. त्यांच्या मृत्यूची चौकशी होऊ देत नाही. हे झरीतले शुक्राचार्य म्हणून देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत हे सर्वांना माहिती आहे. गु्न्हा दाखल करा अशी मागणी आम्हाला करायची गरजच पडायला नको होती. त्यापूर्वीच गुन्हा दाखल व्हायला हवा होता. हे सरकार मुकं, आंधळं, बहिरं सरकार आहे हे आम्ही विरोधक म्हणून सांगतच होतो. आता हे बेशर्म असल्याचेही दिसून येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर