ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

सोलापूर मनपात कोंड्याल की धक्कातंत्र; नवा महापौर आज ठरणार:आज अर्ज दाखल करणार, गोरेंची भूमिका महत्त्वाची, भाजपच्या निर्णयाकडे लक्ष

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महापौरआणि उपमहापौरपदासाठी सोमवारी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. सकाळी 10 ते 11.30 वाजेपर्यंत त्यासाठी मुदत आहे. सोलापूर मनपात 102 पैकी भाजपचे 87 नगरसेवक असल्याने त्यांचाच बिनविरोध महापौर होणार हे निश्चित आहे. पण त्यासाठी पक्षश्रेष्ठी कुणाचे नाव पुढे करते याकडे सर्वांचे लक्ष आहे. कोठे व देशमुख गट आपल्याच उमेदवारांसाठी आग्रही आहेत. त्यामुळे उमेदवार देताना गटबाजी होऊ नये म्हणून पक्षाने व्हीप बजावला. त्यात म्हटले की, ‘पक्षाला न विचारता कोणालाही सूचक वा अनुमोदक होऊ नका.’ कोठे गटाकडून विनायक कोंड्याल व देशमुख गटाकडून किरण देशमुख यांची नावे आतापर्यंत चर्चेत होती. पण आता गटनेतेपदी निष्ठावंत नरेंद्र काळेंची निवड झाल्यानंतर महापौरपदासाठीही गटबाजीऐवजी निष्ठावंतांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे महिलाआघाडी शहराध्यक्षा रंजिता चाकोते यांचेही नाव चर्चेत आले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरेंकडे पक्षाने सर्व निर्णयाचे अधिकार दिले आहेत. ते कोणाचे नाव पुढे करतात यावर नवा महापौराचे भवितव्य ठरेल. पुन्हा महिलेलाच संधी देण्यावर विचारमंथन विनायक कोंड्याल वकिरण देशमुख यांची नावे चर्चेत असतानाच अचानक रंजिता चाकोते यांच्या नावाची चर्चा सुरु करण्यात आली. कोंड्याल हे आमदार कोठे यांचे भाऊजी आहेत. पण ते निवडणुकीपूर्वीच भाजपात आले आहेत. त्यामुळे आयारामांना संधी द्यायची की नाही यावर पक्षात खल सुरु आहे. दुसरीकडे किरण देशमुख हे आमदार पूत्र आहेत, त्यांना संधी दिली तर घराणेशाहीचा ठपका पक्षावर बसू शकतो. तसेच पुन्हा गटबाजीआणि पक्षांतर्गत संघर्ष आणखी पेटण्याची भीती आहे. यावर उपाय म्हणून कुठल्याही गटात नसलेल्या चाकोते यांचे नाव पुढेआलेआहे. त्या पक्षाच्या महिलाआघाडी अध्यक्षाआहेतच. शिवाय रोहिणी तडवळकर यांच्या निकटवर्तीय आहेत. गेली 10 वर्षे महिलाच महापौर होत्या, त्यामुळे पुन्हा महिलेलाच संधी द्यावी, असा मतप्रवाहआहे. नगरसेवकांना न विचारता उमेदवार जाहीर करणार नगरसेवकांना न विचारताच महापौरपदासाठीच्या उमेदवाराची प्रदेश भाजपमार्फत घोषणा होणारआहे. आतापर्यंत भाजप नगरसेवकांच्या दोन वेळा बैठका झाल्या. 19 जानेवारीला हॉटेलमध्ये व 24 जानेवारीला सारस्वत ब्राह्मण मंगल कार्यालयात बैठक झाली. पण त्यात महापौरपदी कोण उमेदवार असावा, याबाबत नगरसेवकांचे मत नेत्यांकडून विचारण्यात आले नाही. त्यामुळे आता सदस्यांना न विचारताच नाव जाहीर होईल. निष्ठावंत नरेंद्र काळेंची निवड झाल्यानंतर महापौरपदासाठीही गटबाजीऐवजी निष्ठावंतांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे महिलाआघाडी शहराध्यक्षा रंजिता चाकोते यांचेही नाव चर्चेत आले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरेंकडे पक्षाने सर्व निर्णयाचे अधिकार दिले आहेत. ते कोणाचे नाव पुढे करतात यावर नवा महापौराचे भवितव्य ठरेल.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर