ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

भंडाऱ्यात माणुसकीला काळिमा:मुलीच्या मैत्रिणीला निर्जनस्थळी नेऊन अत्याचार, पीडितेचे केले विषप्राशन, आरोपीला अटक

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भंडारा जिल्ह्यातील मोहदुरा गावातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या स्वतःच्या मुलीच्या अल्पवयीन मैत्रिणीवर एका नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रसंगामुळे हादरलेल्या पीडित मुलीने विषप्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. आरोपी सोमा मेश्राम (36) याची मुलगी आणि पीडिता या एकाच वर्गात शिकतात. गुरुवारी पीडिता तिच्या मैत्रिणीच्या (आरोपीच्या) घरी थांबली असताना, सोमा मेश्रामने तिला दुचाकीवर फिरवून आणण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तिला एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. शुक्रवारी सकाळी पीडितेने घरच्यांना हा आपबिती सांगितली. पीडितेची प्रकृती आणि पोलिसांची कारवाई या घटनेच्या मानसिक धक्क्यातून पीडितेने विषप्राशन केले. तिला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. भंडारा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी सोमा मेश्राम याला तातडीने अटक केली आहे. त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरातून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे. नाशिकमध्ये तरुणीवर अत्याचार; धर्मांतरासाठीही दबाव पंचवटी परिसरात आणखी एक लव्ह जिहादचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अभियंता तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तीचे लैंगिक शोषण केलेच पण तिची धार्मिक ओळख पुसून टाकण्याचाही प्रयत्न केला. पंचवटी पोलिसांनी संशयित तांजिर इनामदार याला अटक केली. शनिवारी (दि.19) त्याला न्यायालयात हजर केले असता 22 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. याबाबत पीडित तरुणीने तक्रार दिली. पंचवटीतील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना 2024 मध्ये संशयित तांजिर सोबत ओळख झाली. फिरण्याचा बहाणा करत मेरी, म्हसरुळ परिसरातील सार्वजनिक उद्याने, लॉजमध्ये नेत बळजबरीने मिठी मारत तिच्या गळ्याला लव्ह बाईटच्या नावाखाली गंभीर जखमा करत मोबाईलमध्ये फोटो काढून तिला ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली. निरीक्षक ज्योती आमणे तपास करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर