ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

कवी प्रा. जिजा शिंदे यांचा सन्मान:’श्याम मनोहर साहित्य आणि समीक्षा’ ग्रंथास दगडूलाल स्मृती संस्कृती पुरस्कार जाहीर

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कवी, प्राध्यापक आणि समीक्षक जिजा शिंदे यांच्या ‘श्याम मनोहर साहित्य आणि समीक्षा’ या ग्रंथास दगडूलाल स्मृती संस्कृती पुरस्कार जाहीर झाला आहे. इचलकरंजी येथील संस्कृती प्रतिष्ठानतर्फे हे पुरस्कार देण्यात येतात. प्रा. जिजा शिंदे हे छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालयात कार्यरत आहेत. कविता आणि समीक्षा लेखनात त्यांचा हातखंडा आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचा गौरव होत आहे. कादंबरी, कवितेचाही गौरव इचलकरंजीच्या संस्कृती प्रतिष्ठानने आपल्या पुरस्कारांची नुकतीच घोषणा केली. त्यात कादंबरी आणि कविता या साहित्य प्रकारात कोल्हापूर येथील डॉ. रमेश साळुंखे यांच्या ‘भिंगुळवाणे दिवस’ या कादंबरीला लक्ष्मण कांबळे (जिंदा) स्मृती कादंबरी पुरस्कार, तर मुंबई येथील उदय जाधव यांच्या ‘पांढऱ्या शुभ्र स्क्रीनवर’या कवितासंग्रहासाठी वसंत कमल स्मृती संस्कृती काव्य पुरस्कार जाहीर झाला आहे. समीक्षेमध्ये प्रा. जिजा शिंदे यांच्या अष्टगंध प्रकाशन (ठाणे) यांनी प्रकाशित केलेल्या ‘श्याम मनोहर साहित्य आणि समीक्षा’ ग्रंथास दगडूलाल स्मृती संस्कृती समीक्षा पुरस्कार जाहीर झाला आहे. लवकरच सन्मान सोहळा कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे प्रो. आणि समीक्षक रणधीर शिंदे, कवयित्री आणि समीक्षक अंजली कुलकर्णी (पुणे) यांच्या निवड समितीने या पुरस्कारांची निवड केली.मान्यवर पुरस्कार्थींचा लवकरच एका सोहळ्यात गौरव होईल, असे संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महावीर कांबळे, उपाध्यक्ष पंडित कांबळे, सचिव अनुराधा कांबळे, खजीनदार विभावरी कांबळे, संजय रेंदाळकर, दत्तात्रय लाळगे पाटील, सुनील कोकणी यांनी कळवले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर