ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठी उलथापालथ?:ठाकरे गटाचे अर्धे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात? लोकसभेत ताकद वाढवण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, त्यांच्या या दौऱ्यामागे उबाठा खासदारांना आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गटातील जवळपास निम्माहून अधिक खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असून त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत हालचालींना वेग आला आल्याची चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन आगामी रणनीतीवर चर्चा केली आहे. या भेटीचा मुख्य अजेंडा ठाकरे गटाच्या खासदारांचा शिंदे गटात प्रवेश हाच असल्याचे बोलले जात आहे. संसदेत आपले संख्याबळ वाढवणे आणि संघटनात्मक मजबुतीसाठी शिंदेंनी हे विशेष मिशन हाती घेतल्याचे बोलले जात आहे.केवळ चर्चाच नव्हे, तर शिंदेंनी या खासदारांच्या नावांची यादी तपासून कायदेशीर तज्ज्ञांशीही सल्लामसलत केली आहे, जेणेकरून पक्षांतराच्या वेळी कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये अशी माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, या चर्चेवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. आमचे निष्ठावान लोकप्रतिनिधी कुठेही जाणार नाहीत. ज्यांनी घोटाळे केले आहेत, तेच ईडी-सीबीआयच्या भीतीने तिकडे गेले आहेत. आमच्या खासदारांना विकासनिधी दिला जात नसल्याने अडवणूक केली जात आहे, असा आरोप राऊतांनी केला आहे. ठाकरे गटाचे ‘हे’ 9 खासदार रडारवर जर हे पक्षांतर झाले, तर ठाकरे गटाला लोकसभेत मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे 2024 मध्ये 9 खासदार निवडून आले आहेत. अरविंद सावंत (दक्षिण मुंबई),अनिल देसाई (दक्षिण मध्य मुंबई),संजय दीना पाटील (ईशान्य मुंबई),संजय जाधव (परभणी),ओमराजे निंबाळकर (धाराशिव),भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी), राजाभाऊ वाजे (नाशिक), संजय देशमुख (यवतमाळ-वाशीम), नागेश पाटील-आष्टीकर (हिंगोली) यापैकी नेमके कोणते खासदार शिंदेंच्या रडारवर आहेत हे नेमके समोर आलेले नाही. शिंदे सेनेचे हे खासदार आलेत निवडून डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे (कल्याण), नरेश गणपत म्हस्के(ठाणे), रवींद्र दत्ताराम वायकर (मुंबई उत्तर पश्चिम), श्रीरंग अप्पा चंदू बारणे (मावळ), प्रतापराव गणपतराव जाधव – (बुलढाणा) संदीपनराव आसाराम भुमरे –(संभाजीनगर),धैर्यशील संभाजीराव माने(हातकणंगले), हे खासदार शिंदेंच्या नेतृत्वात निवडून आले आहेत. जर उबाठाचे खासदार शिंदेंसोबत आले तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची दिल्लीत ताकद वाढू शकते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर