ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

राहुरी, बारामतीत महायुतीचा ‘एकतर्फी’ करिश्मा:अक्षय कर्डिले अन् सुनेत्रा पवारांच्या विजयाचा अंदाज, काय सांगतो एक्झिट पोल?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघांच्या रिक्त जागांसाठी 23 एप्रिल 2026 रोजी पोटनिवडणूक पार पडली. राहुरीचे भाजप आमदार शिवाजी कर्डिले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री व बारामतीचे आमदार अजित पवार यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. या निवडणुकीत राहुरीमध्ये 56.20 % तर बारामतीमध्ये 58.17 % मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. भाजपने राहुरीतून दिवंगत शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून, त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे, बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार या उमेदवार असून त्यांच्या विरोधात कोणत्याही मोठ्या पक्षाने उमेदवार उभा केलेला नाही. या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘रुद्र रिसर्च अँड ॲनालिटिक्स’ या संस्थेने दोन्ही मतदारसंघात प्रत्यक्ष ग्राऊंडवर जाऊन मतदारांचा कल जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार, दोन्ही ठिकाणी सत्ताधारी पक्षांचे वर्चस्व कायम राहण्याचे संकेत मिळत आहेत. राहुरीमध्ये भाजपचे अक्षय कर्डिले, तर बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांचा मोठ्या मताधिक्याने एकतर्फी विजय होण्याचा अंदाज या संस्थेने वर्तवला आहे. कोणत्याही मोठ्या विरोधाशिवाय बारामतीमध्ये राष्ट्रवादीचा, तर राहुरीमध्ये भाजपचा गड कायम राहण्याचे चित्र या सर्वेक्षणातून समोर आले आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या रिंगणात एकूण 7 उमेदवार असून यामध्ये भाजपचे अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे गोविंद मोकाटे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बंडखोर नेते रावसाहेब खेवरे आणि वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांच्यासह तीन अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. तर दुसरीकडे बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासह इतर 22 असे एकूण 23 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. अक्षय कर्डिले किती मतांनी विजयी होणार? ‘रुद्र रिसर्च’च्या सर्वेक्षणानुसार, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले तब्बल 1 लाख 17 हजार (62%) मतांच्या विक्रमी फरकाने एकतर्फी विजय मिळवून आपला गड राखतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अंदाजानुसार कर्डिले यांना 1,42,500 (76%) मते मिळण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना केवळ 25,500 (14%) मतांवर समाधान मानावे लागेल. स्व. शिवाजी कर्डिले यांच्याबद्दलची सहानुभूती, माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांची माघार, विखे-पाटील कुटुंबीयांचा पाठिंबा आणि आमदार संग्राम जगताप व मोनिका राजळे यांनी अनुक्रमे अहिल्यानगर व पाथर्डी तालुक्यात केलेले प्रभावी निवडणूक नियोजन या बाबी कर्डिले यांच्या विजयासाठी निर्णायक ठरताना दिसत आहेत. याशिवाय, महाविकास आघाडीला प्रचारात आलेल्या मर्यादा, अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांच्यामुळे होणारे संभाव्य मतविभाजन आणि तगड्या विरोधकाचा अभाव यामुळे अक्षय कर्डिले यांचा विजय निश्चित असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे. सुनेत्रा पवार किती मतांनी होणार विजयी? ‘रुद्र रिसर्च’च्या सर्वेक्षणानुसार बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार या 2 लाख 7 हजार मतांच्या विक्रमी मताधिक्याने ऐतिहासिक विजय मिळवतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अंदाजानुसार सुनेत्रा पवार यांना 2,12,000 (95%) तर इतर उमेदवारांना एकत्रितपणे केवळ 11,705 (5%) मते मिळण्याची शक्यता आहे. पवार कुटुंबीयांचा मतदारसंघातील दांडगा संपर्क, स्व. अजित पवार यांच्या निधनामुळे जनमानसात असलेली सहानुभूतीची लाट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झालेली सभा आणि कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाने विरोधात उमेदवार न दिल्याने सुनेत्रा पवारांचा विजय एकतर्फी मानला जात आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आवाहनानंतर दोन्ही मतदारसंघांतील प्रमुख स्पर्धकांनी माघार घेतल्याने महायुतीच्या उमेदवारांचा मार्ग अधिक सुकर झाला असून, याचा मोठा फायदा सुनेत्रा पवार यांना होताना दिसत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर