ब्रेकिंग न्यूज
FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज…
SP News Maregaon

राम मंदिर देणगीवरून संजय राऊत आक्रमक:मंदिरासाठी दिलेली चांदीची वीट कुठे? पावतीही नाही, चौकशीची मागणी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलेल्या ४ किलो चांदीच्या विटेचा ठावठिकाणा अद्याप समोर न आल्याचा दावा करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राम मंदिर ट्रस्टवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 1 कोटी रुपये आणि चांदीची वीट संजय राऊत यांनी म्हटले आहे की, राम मंदिराच्या बांधकामासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने 1 कोटी रुपयांहून अधिक आर्थिक मदतीसह 4 किलो वजनाची पवित्र चांदीची वीट हजारो शिवसैनिक आणि संत-महंतांच्या उपस्थितीत अर्पण केली होती. मात्र, वर्षे उलटून गेल्यानंतरही त्या चांदीच्या विटीबाबत कोणतीही अधिकृत पावती किंवा माहिती राम मंदिर ट्रस्टकडून देण्यात आलेली नाही, असा दावा त्यांनी केला. पूर्ण चौकशीची मागणी “ही चांदीची वीट नेमकी कुठे गेली? तिचा वापर कशासाठी झाला? याची माहिती जनतेसमोर यायला हवी. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जबाबदारी निश्चित केली पाहिजे,” अशी मागणी राऊत यांनी केली आहे. ‘ऑपरेशन टायगर’वरून संजय राऊतांचा टोला उद्धव ठाकरे यांनी आजपासून शिंदे गटात गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा सुरू करत आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे एक दिवस ते देवेंद्र फडणवीसांनाही फोडल्याचा दावा करतील,” असा टोला लगावला. उद्धव ठाकरे हे शिंदे गटात गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांशी संवाद साधणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. दरम्यान, ठाकरे गटातील काही आमदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याच्या चर्चांवरही त्यांनी भाष्य केले. शिंदेंना फोडाफोडीची नशा चढली – राऊत या चर्चांना उत्तर देताना राऊत म्हणाले, “ते कोणालाही फोडू शकतात. उद्या ते म्हणतील, देवेंद्र फडणवीसांनाही फोडलं, त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनाही फोडल्याचा दावा करतील. शेवटी अमित शहांनाही फोडल्याचं सांगतील. फोडाफोडीची नशा चढली की माणूस काहीही बोलू लागतो.” राऊत यांनी पुढे दावा केला की, “ऑपरेशन टायगरपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनीच सर्वाधिक सावध राहण्याची गरज आहे. कारण अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.” आम्ही स्वतःच टायगर ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर बोलताना त्यांनी, “आमचं कोणतंही ऑपरेशन टायगर नाही. आम्ही स्वतःच टायगर आहोत. टायगर कोण आणि इतर कोण, हे जनतेला चांगलंच माहिती आहे,” असा उपरोधिक टोला लगावला. हे ही वाचा… अयोध्येत SIT ने विचारले- हार, चरण पादुका कोणाला दिले: महंत म्हणाले- टिन्नूला दिले; चांदीची वीट देणाऱ्या व्यापाऱ्याने सत्य सांगितले अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात एसआयटी (विशेष तपास पथक) आता अशा देणगीदारांशी संपर्क साधत आहे, ज्यांनी मंदिर ट्रस्टच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला दागिने दिले होते. एसआयटी आपल्या अहवालात हे तथ्य समाविष्ट करेल की कधी आणि कोणाच्या हातात दागिने सोपवले गेले. कोणती पावती दिली होती की नाही. एसआयटीने गुरुवारी (18 जून) मुंबईतील एक व्यावसायिक अनिल विश्वकर्मा यांचे जबाब नोंदवले. व्यवसायिकाचा आरोप आहे, ‘आम्ही रामलल्लासाठी 3 किलो चांदीचा हार आणि 1 किलो चांदीच्या चरण पादुका टिन्नू यादव यांना दिल्या होत्या, पण मंदिराकडून कोणतीही पावती मिळाली नाही.’ सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर