ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

PM नरेंद्र मोदींनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली:टीका करणाऱ्या राहुल गांधींनी एक वर्ष तरी देशात राहून दाखवावे- एकनाथ शिंदे

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटातील नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केले आहे. यावेळी बोलताना शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. तसेच राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, प्रधानमंत्री मोदी यांनी यशस्वी कारकीर्द गाजवलेली आहे. एकही सुट्टी न घेता काम करणारे प्रधानमंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्याचबरोबर 2024 नंतर या देशाला प्रगती पथावर नेण्याचे काम त्यांनी केले आहे. आपली अर्थव्यवस्था मजबूत केली. इतर देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना आपली अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर आणली. 2014 पूर्वीची परिस्थिती जर आपण पाहिली तर विविध घोटाळे आपण पाहिले. परंतु मोदींच्या कार्यकाळात त्यांना एकही डाग लावण्याचे काम कोणी करू शकले नाही. राहुल गांधींनी एक वर्ष तरी देशात राहून दाखवावे देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी देशाची परिस्थिती बिकट असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली होती. यावर विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले, राहुल गांधी नेहमीच देशाच्या विरोधात आरोप लावत असतात. देशात असतात तेव्हा देखील आरोप करत असतात, देशाच्या बाहेर जातात तेव्हा देखील आरोप करतात. ऑपरेशन सिंदूरमध्ये लढलेल्या सैनिकांच्या विरोधातही ते बोलतात. आता ते म्हणाले की पंतप्रधान मोदी एक वर्षानंतर पंतप्रधान नाही राहणार, मी तर म्हणतो, ते एक वर्षच नाही ते येणारे अनेक वर्षांपर्यंत या देशाचे नेतृत्व करतील. माझे एकच म्हणणे आहे राहुल गांधींना की तुम्ही एक वर्ष सातत्याने देशात तरी राहून दाखवा, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीवरून उद्धव ठाकरेंवर टोला इंडिया आघाडीची बैठक झाली. त्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागणी केली की इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदासाठी चेहरा घोषित करा. यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, एनडीएकडे चेहरा आहे नरेंद्र मोदी. पण त्यांच्याकडे कोणता चेहरा आहे? त्यांच्यात एवढे मतभेद आहेत. इंडिया आघाडीमध्ये जे जातात ते पराभूत होतात. त्यामुळे ते सगळे इंडिया आघाडीमधून अनेक पक्ष बाहेर पडत आहेत. अजून एक कोणीतरी ऑनलाइन आले, फेसबुक लाईव्ह करायला आले, असे म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. बच्चू कडूंच्या विधानवार काय म्हणाले शिंदे? बच्चू कडू यांनी म्हटले होते की एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, बघा आता ही वेळ आहे का? आता काही जागा रिक्त आहे का? आहे का? मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि आम्ही एक टीम म्हणून काम करत होतो. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही सगळे टीम म्हणून काम करत आहोत. आमच्यात चांगले बॉंडिंग आहे. हे बॉंडिंग कायम राहणार आहे. कार्यकर्त्यांची भावना असते, ते बोलून जातात. मी खुर्चीसाठी लढत नाही. आमचा अजेंडा खुर्ची नाही, आमचा अजेंडा हा महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करणे आहे. त्यामुळे आमच्यात चांगली बॉंडिंग आहे आणि जिथे कुठे आमच्या आमदार आणि खासदारांना जिथे कुठे त्रास असेल तिथे आम्ही आणि मुख्यमंत्री बसून चर्चा करू, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर