ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

कॉर्पोरेट जिहाद:शिरखुर्म्यातून गुंगीचे औषध देऊन तरुणाच्याही धर्मांतराचा झाला प्रयत्न; कोठडीत धक्कादायक कबुली

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणामध्ये एकामागून एक धक्कादायक प्रकारांची ‘क्रोनोलॉजी’ समोर येत आहे. पीडित हिंदू तरुणाला जाळ्यात ओढून, त्याला शिरखुर्म्यातून गुंगीचे औषध देत धर्मांतराचा व बळजबरीने नमाज पठण करायला लावल्याचा संतापजनक प्रकार तपासात उघडकीस आला आहे. या प्रकरणी अटकेतील चारही संशयित ४ मे पर्यंत कोठडीत आहेत. तपासात स्पष्ट झालेल्या व सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितांनी नियोजनबद्ध पद्धतीने हा कट रचला होता. पीडित तरुणाशी मैत्रीचा बनाव केला. ईदला शिरखुर्मा खाण्यासाठी त्याला बोलावले व त्यातून गुंगीचे औषध दिल्याचा संशय आहे. ते गुंगीचे औषधच हाेते, की अमली पदार्थ हाेते, याचाही तपास केला जात आहे. ते पदार्थ खाल्ल्यानंतर पीडित तरुण शुद्धीत नसताना त्याच्या डोक्यावर टोपी ठेवून बळजबरीने नमाज पठणास भाग पाडले गेले. याशिवाय या गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार जप्त केल्या आहेत. पीडितांला नक्की कोणत्या हॉटेलमध्ये नेले होते व यामागे आणखी कोणते ‘मोठे मासे’ आहेत, याचा शोध सुरू आहे. या प्रकारातील संशयित दानिश शेख याने २०१७ मध्ये कंपनीत एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या शिफारशीने नोकरी मिळवल्याचे समोर आले आहे. मोबाइल अनलाॅक करण्यात यश, उघडणार डर्टी सिक्रेट या प्रकारातील संशयित दानिश शेखचा ‘फेस आयडी’ वापरून फाॉरेन्सिक लॅबमध्ये त्याचा मोबाइल अनलाॅक करण्यात आला आहे. या मोबाइलमधून अनेक धक्कादायक चॅट्स, आर्थिक व्यवहार, काही परदेशांमधील आर्थिक व्यवहार आणि पीडित तरुणीला मलेशियात पाठवण्याचे काही संदेश असून एक मोठे रॅकेट उघडकीस आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. इनसाइड स्टोरी – फाेटाेद्वारे मानसिक खच्चीकरण, ब्लॅकमेलिंगचाही प्रयत्न नमाज पठण करतानाचे पीडित तरुणाचे फोटो ऑफिसच्या ग्रुपवर शेअर केले, जेणेकरून त्याचे मानसिक खच्चीकरण करता येईल. संशयितांनी केवळ नशेचाच वापर केला नाही तर पीडित तरुणाला ‘ब्लॅक मॅजिक’ झाल्याचे सांगून भीती दाखवली. “तुझ्यावर संकट आहे’ असे भासवून त्याला धर्मांतराच्या वाटेवर नेण्याचा हा क्रूर प्रयत्न होता, याची आपबितीही पीडिताने तपासात सांगितली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर