ब्रेकिंग न्यूज
महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम
SP News Maregaon

दो बुंद जिंदगी के:शहरात 196 बूथवर 34,594 बालकांचे पहिल्या दिवशी केले पोलिओ लसीकरण, आणखी 5 दिवस सुरू राहणार मोहीम

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार २८ जूनला संपूर्ण देशभर राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात आली. पहिल्या दिवशी जळगावला ३४ हजाराहून अधिक बालकांना लस देण्यात आली. जिल्ह्यात ४ लाखांहून अधिक बालकांना पोलिओचा डोस पाजण्याचे उद्दिष्ट असून, पहिल्याच दिवशी प्रत्येक केंद्रावर नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला. शहरात महापालिका रुग्णालयांसह जीएमसी व प्रत्येक कॉलनी परिसरात असे १९६ बूथ तयार केले होते. याठिकाणी सकाळी ८ ते ५ यावेळेत ४०६१९ पैकी ३४५९४ (८५%) बालकांना लस दिली. महापालिकेतर्फे सकाळी महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी व अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी आणि महानगरपालिका क्षेत्र मिळून एकूण ४ लाख ७ हजार ९७८ बालकांना डोस देण्याचे नियोजन आहे. दरम्यान ज्या बालकांना रविवारी लस देणे शक्य होणार नाही त्या बालकांना पुढील पाच दिवस लस दिली जाणार आहे. तसेच या मोहिमेत खासगी रुग्णालयात देखील या टीम जाणार असून, प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक कॉलनी परिसरात एक बूथ तयार करण्यात आल्याने घराजवळ बाळाला लस देण्यात आली. प्रतिनिधी | पाळधी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ रविवारी पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते एका चिमुकल्या बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून करण्यात आला. कोणतेही बालक या लसीकरणापासून वंचित राहू नये, ही केवळ आरोग्य विभागाची नव्हे तर पालक आणि संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. शासनाच्या या लोकहिताच्या मोहिमेत प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या बालकांचे सुरक्षित भविष्य घडवण्यास हातभार लावावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. कार्यक्रमास जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करिष्मा नायर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश झंवर, डॉ. सायमा खान, सरपंच विजय पाटील, ग्रामविकास अधिकारी दीपक पाठक, आशा सेविका व आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रांवर पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले. प्रतिनिधी | नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने राबवण्यात आलेल्या पल्स पोलिओ अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानात आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील ३७ बूथवर मोहीम राबवण्यात आली. दिवसभरात ७,७७५ बालकांना पोलिओची मात्रा देण्यात आली असून, लसीकरणाचे ९६ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आरोग्य विभागाला यश आले. या अभियानाचा शुभारंभ नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यांनी पालकांना आपल्या बालकांचे लसीकरण वेळेत करून पोलिओमुक्त भारताच्या संकल्पाला बळकटी देण्याचे आवाहन केले. आरोग्य अधिकारी सचिन भायकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रमोद बदादे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांनी पोलिओ लसीकरणाचे अभियान यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. आरोग्य विभागाने उर्वरित पात्र बालकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी घरभेटीद्वारे मोहीम सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर