ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

रूपाली चाकणकर ईडी कार्यालयात दाखल:अशोक खरात प्रकरणात चौकशीला सुरुवात; खंडणी रॅकेटप्रकरणी हालचाली वेगात

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिकमधील भोंदू बाबा म्हणून चर्चेत आलेल्या अशोक खरात प्रकरणात आता मोठी घडामोड समोर आली आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर या आज सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात दाखल झाल्या असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. विशेष तपास पथकाने काही दिवसांपूर्वीच त्यांची सविस्तर चौकशी केली होती. त्यानंतर आता ईडीने थेट या प्रकरणात प्रवेश केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 70 कोटी रुपयांच्या कथित खंडणी रॅकेटशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या अनुषंगाने ही चौकशी केली जात आहे. अशोक खरात याच्यावर मोठ्या प्रमाणात खंडणी उकळल्याचे गंभीर आरोप आहेत. तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, या कथित रॅकेटमधून 70 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची उलाढाल झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या पैशांचे व्यवहार लपवण्यासाठी अनेक बेनामी बँक खात्यांचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या आर्थिक साखळीतील काही धागेदोरे रूपाली चाकणकर यांच्यापर्यंत पोहोचल्याने तपास यंत्रणांनी त्यांच्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांच्या या व्यवहारांशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध होता का, याची पडताळणी आता ईडीकडून केली जात आहे. विशेष तपास पथकाने नाशिकमध्ये रूपाली चाकणकर यांची साडेपाच तास चौकशी केली होती. त्या चौकशीदरम्यान विविध आर्थिक व्यवहार, काही संस्थांशी संबंधित कागदपत्रे आणि संपर्कांची माहिती तपास अधिकाऱ्यांनी तपासली होती. एसआयटीच्या चौकशीनंतर लगेचच ईडीने हालचाली वाढवल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. मनी लाँड्रिंग, आर्थिक गैरव्यवहार आणि बेकायदेशीर आर्थिक देवाणघेवाण यासंदर्भात स्वतंत्र तपास सुरू करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात ‘शिवनिका’ नावाची संस्था देखील तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहे. या संस्थेमधील रूपाली चाकणकर यांच्या भूमिकेची तपासणी सुरू आहे. अशोक खरातने कथितरीत्या जमा केलेल्या पैशांचा वापर या संस्थेमार्फत झाला का, तसेच आर्थिक व्यवहार लपवण्यासाठी कोणती मदत करण्यात आली का, याचा शोध घेतला जात आहे. याशिवाय या व्यवहारांचे धागेदोरे महाराष्ट्राबाहेरील इतर राज्यांपर्यंत पोहोचतात का, याचाही तपास सुरू असल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर