ब्रेकिंग न्यूज
⚡ News18 Marathi Headlines | 16 NOV | 9 AM | Maharashtra Politics | Fadnavis |Shinde | NCP| FDA ✦ ⚡ IND vs PAK : 1 बॉल 3 रन… टीम इंडियाने शेवटच्या बॉलवर नांग्या ठेचल्या; पाकिस्तानच्या पब्लिकचा रस्त्यावर हा… ✦ ⚡ देवदर्शनासाठी गेलं कुटुंब, घरी कोणीही नसल्याची साधली संधी, नाशिकमध्ये 12 लाखांची चोरी ✦ ⚡ मारेगाव तालुक्यात २ कोटी २२ लाखांच्या विकासकामांचा धडाका! ✦ ⚡ मारेगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत लक्ष्मीपूजन; नवनिर्वाचित संचालिका किरणताई देरकर यांचा सन्मान ✦ ⚡ IND vs NZ 5th ODI : टीम इंडिया 34-3… न्यूझीलंडमध्ये ROKO चा ‘एन्ड गेम’, ज्याची भीती होती तेच झालं! गंभीरन… ✦ ⚡ Pune Amit Shah: पुणेकरांनो लक्ष द्या! अमित शहांच्या दौऱ्यानिमित्त पुढील 2 दिवस वाहतुकीत मोठे बदल, कोणते मार… ✦ ⚡ पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, डाळिंबाच्या बागेत केली वांग्याची शेती, 3 लाख रुपयांचा निव्वळ नफा,… ✦ ⚡ Karad: बँक मॅनेजरने राहत्या प्लॅटमध्ये संपवलं आयुष्य, ‘त्या’ चिठ्ठीनं खळबळ, कराडात काय घडलं? ✦ ⚡ पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बसवर काळाचा घाला, थेट पूलावरून खाली कोसळली गाडी, 21 हून अधिक प्रवासी बसमध्ये
SP News Maregaon

कुर्डुवाडी पालिकेला वर्षभरापासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळेना:कारभार ”प्रभारी”वर असल्याने धोरणात्मक निर्णय रखडले

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कुर्डुवाडी नगरपालिकेचा कारभार गेल्या सुमारे एका वर्षापासून कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांविना सुरू असल्याने शहराच्या विकासाला जणू ब्रेक लागला आहे. सध्या पालिकेचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू असल्याने धोरणात्मक निर्णय घेण्यास मर्यादा येत असून, याचा थेट फटका शहराच्या दैनंदिन स्वच्छतेपासून ते कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांना बसत आहे. शासन स्तरावरून कुर्डुवाडी पालिकेबाबत दाखविल्या जाणाऱ्या या उदासीनतेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख म्हणून मुख्याधिकारी हे अत्यंत महत्त्वाचे पद असते. शहराचे आर्थिक नियोजन, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर वचक ठेवण्याचे काम मुख्याधिकाऱ्यांचे असते. मात्र, गेल्या वर्षभरापासून येथे कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने प्रशासकीय घडी पूर्णपणे विस्कटली आहे. अनेक महत्त्वाच्या फाईल्स मंजुरीअभावी पडून आहेत. संपूर्ण महिन्याभरात एक किंवा दोनवेळाच मुख्याधिकारी कुर्डुवाडी कार्यालयात येतात. प्रभारी अधिकाऱ्यांना मूळ पद सांभाळून कुर्डुवाडीचा अतिरिक्त भार सांभाळावा लागत असल्याने, त्यांना शहराच्या समस्यांना पूर्ण वेळ देणे शक्य होत नाही. परिणामी, पालिकेत येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आपल्या कामांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. . अंदाजपत्रक केवळ कागदावर : पालिकेच्या अंदाजपत्रकीय तरतुदींनुसार नवीन विकासकामांच्या निविदा काढण्यास विलंब होत आहे. . कर्मचाऱ्यांवर वचक नाही : मुख्याधिकाऱ्यांच्या रोजच्या अनुपस्थितीमुळे पालिकेच्या विविध विभागांमधील प्रशासकीय शिस्तीला तडे गेले आहेत. एकीकडे शासन शहरांच्या विकासाचे मोठे दावे करत असताना, कुर्डुवाडीसारख्या महत्त्वाच्या रेल्वे जंक्शन आणि व्यापारी केंद्र असलेल्या शहराला वर्षभर मुख्याधिकारी देऊ नये, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याप्रश्नी मंत्रालयात वजन वापरून कायमस्वरूपी सक्षम अधिकारी आणणे गरजेचे होते, मात्र अनास्थाच दिसून येत असल्याची चर्चा नागरिकांत आहे. कुर्डुवाडी शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत पाणीपुरवठा योजना, रस्त्यांची कामे, भुयारी गटार योजना, आणि शहरातील स्वच्छता या गोष्टींवर नियमित लक्ष ठेवणे गरजेचे आहे. परंतु, पूर्णवेळ नियंत्रण नसल्याने शहरात अनेक प्रभागांमधील रस्ते आणि पथदिव्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. नवीन घरबांधणी परवाने आणि शासकीय दाखल्यांसाठी नागरिकांना अनेक दिवस वाट पाहावी लागत आहे. काही महत्वाच्या फाईलवर सह्या हव्या असतील तर कर्मचाऱ्यांना करमाळा नगरपालिका कार्यालयात फाईल घेऊन बोलावले जाते. कर्मचाऱ्यांनाही महत्वाच्या कामांच्या फायली घेऊन मुख्याधिकारी करमाळा यांच्या कार्यालयाकडे जावे लागत आहे. यामध्ये विनाकारण कर्मचाऱ्यांची मधेच ससेहोलपट होताना दिसत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर