ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

मुदत संपली तरी 12 नाशिकच्या तालुक्यांना केरोसीनची अद्यापही प्रतीक्षाच:येवला, पेठ, इगतपुरी या तीन तालुक्यांनाच वितरण

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अमेरिका आणि इराण युद्धाच्या सावटामुळे देशात इंधन व गॅसटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, सर्वसामान्यांची चूल पेटती राहावी यासाठी राज्य सरकारने शिधापत्रिकाधारकांना 61 रुपये प्रतिलिटर दराने केरोसीन देण्याचा निर्णय घेतला. मात्र, नाशिक जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी कागदावरच असल्याचे चित्र आहे. मे महिना अर्धा संपला तरी जिल्ह्यातील 12 तालुके अद्याप केरोसीनच्या प्रतीक्षेत आहेत. 15 तालुक्यांसाठी तहसीलदारांनी एकूण 25 लाख 9 हजार 97 लिटर केरोसीनची मागणी नोंदवली होती. मात्र, प्रशासनाने मार्च आणि एप्रिलसाठी केवळ 2 लाख 28 हजार लिटर कोटा मंजूर करण्यात आला. 15 मे उजाडला तरी यातील केवळ 36 हजार लिटर केरोसीनचे वाटप झाले असून, उर्वरित तालुक्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आतापर्यंत येवला, पेठ आणि इगतपुरी या तीन तालुक्यांत प्रत्येकी 12 हजार लिटरप्रमाणे वितरण झाले आहे.
वितरण मुदत संपली राष्ट्रवादीच्या आमदारांच्या तालुक्यांनाच रॉकेल दिले आहे. वितरणाची मुदत संपली तरी वाटप होत नसल्याने या प्रक्रियेवर संशय निर्माण होत आहे. – प्रकाश गोहाड, अध्यक्ष, रॉकेल विक्रेता संघटना मिळाल्यानंतर वाटप केरोसीन उपलब्ध होईल तसे उर्वरित तालुक्यांना देण्यात येईल. 61 रुपये प्रतिलिटर दराने हे वाटप स्वस्त धान्य दुकानातून केले जाणार आहे. – रमेश गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी इतर तालुक्यांना डावलल्याचा आरोप विशेष म्हणजे ज्या तालुक्यांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, तिथेच केरोसीन पोहोचले आहे. इतर तालुक्यांना डावलले जात असल्याचा आरोप रॉकेल विक्रेता संघटनेने केला आहे. या तालुक्यातील नागरिकांनी काय करावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता अल्टीमेटम जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मार्च-एप्रिलचा कोटा 25 मार्चपर्यंत उचलण्याचे आदेश दिले होते. मुदत संपल्यानंतर कोणतीही वाढ मिळणार नाही, असे स्पष्ट केले होते. तसेच कंपनी डेपोतून येणाऱ्या टँकरची तहसीलदार स्तरावर तपासणी करण्याचेही कडक आदेश त्यांनी दिले आहेत. मात्र, प्रशासकीय दिरंगाईमुळे सामान्य नागरिक भरडला जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर