ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:‘मला आई बनवा अन् 25 लाख मिळवा’; घरबसल्या कमाईच्या नावाखाली सायबर चोरट्यांचा प्रेग्नन्सी फ्रॉड

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


‘मला आई बनवण्यासाठी मदत करा, त्यासाठी मी 25 लाख रुपये द्यायला तयार आहे,’अशा आशयाचे मेसेज पाठवून पुरुषांना जाळ्यात ओढले जाते. या आमिषाला स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी मुले, कामगार आणि आंबटशौकीन तरुण बळी पडत आहेत. महिनाभरामध्ये शहरात असे 6 प्रकार उघडकीस आले असून याप्रकरणी सायबर ठाण्यात तक्रारी दाखल आहेत. सोशल मीडिया अकाउंटवर तरुणांना भुरळ पडेल अशा महिलांचे फोटो अपलोड केले जातात. त्यांची श्रीमंत महिला म्हणून प्रोफाइल तयार केली जाते. ‘खूप दिवसांपासून अपत्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, गर्भधारणा होत नाही. त्यामुळे मला आई बनायचे आहे,’ असा मेसेज तयार करून तरुणांना जाळ्यात ओढले जाते. त्यानंतर तरुणांना निवडीच्या नावाखाली अंगप्रदर्शन करायला लावतात. समोरच्या व्यक्ती व्हिडिओवरून छायाचित्रे काढतात. त्याचबरोबर या सर्व प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाते. व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करण्याचा व पैसे उकळण्याचा प्रकार सुरू होतो, असे पोलिसांनी सांगितले.. केस 1 : कंपनीतील अकाउंटंट वाळूजच्या एका कंपनीतील 26 वर्षांच्या अकाउंटंट तरुणाला ‘प्रेग्नन्सी जॉब’चे आमिष दाखवण्यात आले. त्याने रजिस्ट्रेशनसाठी 8,000 रुपये भरले. त्याला 40,000 महिना पगार देण्याचे ठरले, परंतु पैसे घेऊन फसवणूक करण्यात आली. केस 2 : स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका ग्रामीण भागातील युवकाने टेलिग्रामवर नोंदणीसाठी 15,000 रुपये भरले. पार्टटाइम जॉबचे प्रलोभन देऊन पैसे घेण्यात आले, पण कोणताही जॉब दिला गेला नाही. सायबर कायद्यानुसार आरोपींवर दाखल कलमे, शिक्षेचे स्वरूप सायबर फसवणूक (प्रेग्नन्सी फ्रॉड) करणाऱ्या झारखंडमधील टोळीवर भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 अंतर्गत खालील प्रमुख कलमे दाखल होऊ शकतात. ही कलमे गंभीर स्वरूपाची असून त्यांच्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. फसवणुकीच्या पायऱ्या अशा मुलींचे फोटो वापरून तरुणांना ओढतात जाळ्यात मुलांना फसवण्यासाठी मुलींची छायाचित्रे वापरली जातात. अनेक मुलींना नकळत त्यांचे फोटो चोरून या टोळ्या वापरतात. या चॅटिंगमध्ये अश्लील कृत्ये करून घेतली जातात, त्याचे फोटो आणि व्हिडिओ नंतर ब्लॅकमेलिंगसाठी वापरले जातात. अनेक वेळा तर मुलांना गुन्हेगारीत ओढले जाते. पोलिसांनी सांगितले की काही प्रकरणांत तर मुलांना धमकावून पैसे उकळले जातात. अशी घ्या खबरदारी, नाही तर फसवणूक निश्चित सोशल मीडियावर आलेल्या कोणत्याही आर्थिक प्रस्तावांवर विश्वास ठेवू नका. अनैतिक किंवा गोपनीय संबंधाबाबत मिळणाऱ्या ऑफर्स खोट्याच असतात. रजिस्ट्रेशन, व्हेरिफिकेशन किंवा जीएसटी अशा नावाखाली पैसे मागितले तर त्वरित सावध व्हा अनोळखी क्रमांकावरून आलेल्या व्हिडिओ कॉलला प्रतिसाद देऊ नका मॉडेल्सचे फोटो, फेक प्रोफाइल्स आणि परदेशी क्रमांक असलेले संपर्क क्रमांक त्वरित ब्लॉक करा. फसवणूक झाल्यास हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधा. नातेवाइकांना पाठवतात स्क्रीनशॉट पैसे घेतले अन् ब्लॉक केले फेसबुकवरील एका व्हिडिओतील आश्वासनावर विश्वास ठेवून मी प्रेग्नंट जॉब नावाच्या कंपनीच्या नावाखाली बोलणाऱ्या धर्मेंद्र पटेल व ज्योती शर्मा यांच्या संपर्कात आलो. ओळखपत्र, जीएसटी, टीडीएस, मशीन चार्ज अशा विविध कारणांनी त्यांनी माझ्याकडून सलग रकमेची मागणी केली. मी माझ्या स्टेट बँक व युनियन बँक खात्यातून पैसे पाठवले. दरम्यान, आरोपींनी माझा नंबर ब्लॉक केल्यानंतर माझी फसवणूक झाल्याचे लक्षात आले. -एक पीडित. प्रतिसाद देऊ नये सामाजिक, आर्थिक आणि लैंगिक भावनांचा गैरफायदा घेऊन सायबर चोरटे पुरुषांना जाळ्यात ओढत असल्याचे प्रकार घडत आहेत. अशा मेसेजला कोणत्याही परिस्थितीत प्रतिसाद देऊ नये. अशा प्रकारच्या ऑफर्सना कोणतेही कायदेशीर अस्तित्व नाही. त्यामुळे पुरुषांनी अधिक सावध राहणे आवश्यक आहे. फसवणूक केल्यास तत्काळ सायबर पोलिस किंवा 1930 वर संपर्क करा. -रत्नाकर नवले, पोलिस उपायुक्त.‎‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर