ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

मोटेगावकर देशमुखांच्या जवळचे:काँग्रेस आणि नीट पेपर फुटीचे थेट संबंध, मग संजय राऊत गप्प का?; भाजपच्या नवनाथ बन यांचा सवाल

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयच्या अटकेत असलेले लातूरच्या आरसीसी क्लासेसचे शिवराज मोटेगावकर यांनी पूर्वी काँग्रेसचा प्रचार केलेला आहे. ते देशमुखांच्या जवळचे होते. काँग्रेस आणि नीट पेपर फुटीचा थेट संबंध आहे. या प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संजय राऊत गप्प का आहेत, खरे तर काँग्रेसची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मंगळवारी भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली. घरात आंदोलन करता येत नाही म्हणून किमान मातोश्रीच्या दारात येऊन उद्धव ठाकरेंनी महागाई वाढली म्हणून आंदोलन करावे आणि मग इतरांना शहानपण सांगावे. संजय राऊत भांडूप अन् सामनाच्या बाहेर पडायला तयार नाहीत, आणि लोकांना सांगणार आंदोलन करा. पण जनता हुशार आहे, ते पंतप्रधानाच्या मागे उभे आहेत, उद्धव ठाकरे यांच्यात आंदोलन करण्याची हिंमत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीच्या बाहेर पडावे आणि महागाईच्या विरोधात आंदोलन करावे त्यांना कोणी रोखले आहे. महागाई वाढली म्हणत आहेत ना मग उद्धव ठाकरेंनी मातोश्रीच्या बाहेर येत आंदोलन करावे, कारण ते रस्त्यावर तर काही येऊ शकणार नाही. नीट पेपर फुटी प्रकरणात कारवाई होणारच नवनाथ बन म्हणाले की, नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम केंद्र सरकारकडून सीबीआयच्या माध्यमातून सुरू आहे. या प्रकरणात कोणालाही पाठिशी घालणार नाही. संजय राऊत ज्या पद्धतीने आरोप करत आहे, त्यांनी काँग्रेसच्या अमित देशमुख यांना प्रश्न का केला नाही. मोटेगावकरांनी काँग्रेसचा प्रचार करण्याचे काम निवडणुकीच्या काळात केले त्याला अटक करण्यात आली यावर राऊत का बोलत नाही. राऊतांनी काँग्रेसला प्रश्न विचारले पाहिजे. कोणालाही सोडणार नाही नवनाथ बन म्हणाले की, महाराष्ट्राने उबाठाला नीट धडा शिकवला आहे. याचा प्रत्यय विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दिसून आला आहे. त्यामुळे आपला पक्ष सांभाळा आणि मग इतरांवर टीका करा. भाजप विद्यार्थ्याचे कुठलेही नुकसान होऊ देणार नाही. या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही. काँग्रेस आणि नीट पेपर फुटीचे थेट संबंध येत आहे त्यावर राऊतांनी प्रश्न विचारले पाहिजे. मोदींमुळे देश सुरक्षित नवनाथ बन म्हणाले की, आखाती देशातील युद्धामुळे पाकिस्तानमध्ये पेट्रोल 500 रुपये लीटर झाले आहे. श्रीलंकेत लॉकडाऊनची वेळ आली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे देशातील जनतेला महागाईची झळ बसली नाही. आज जर काँग्रेसचे सरकार असते तर पेट्रोल-डिझेल 200-300 रुपये झाले असते आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार असते तर 500 रुपये झाले असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देश सुरक्षित आहे. पंतप्रधान ठाकरेंसारखे लंडन वाऱ्या करत नाही नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लंडन वारीसारखे विदेश दौरे करत नाही. पहलगामध्ये हल्ला झाला त्यावेळी उद्धव ठाकरे लंडनमध्ये थंड हवा खात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाची रणनीती आखण्यासाठी परदेश दैाऱ्यावर जातात. जागतिक पातळीवर भारताचे नाव मजबूत करण्यासाठी त्यांचे दौरे असतात. ते फोटो काढण्यासाठी लंडनला जात नाहीत. तिथे जाऊन ते मॉलमध्ये शॉपिंग करत बसत नाहीत, हे राऊतांनी लक्षात ठेवावे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर