ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

नागपूरमधील संघ मुख्यालयाची रेकी करणाऱ्याला डॉलरमध्ये निधी:पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण, नागपुरात रेकीचा कट

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची रेकी केल्याप्रकरणी तपास यंत्रणांसमोर अत्यंत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. दहशतवादी रईस अहमद शेख अब्दुला शेख याला या कामासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. या संपूर्ण कटाची सूत्रे थेट पाकिस्तानात हलवली गेल्याचे तपासातून समोर आले असून, पाकव्याप्त काश्मीरमध्ये त्याला विशेष प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती सरकारी यंत्रणांनी न्यायालयात मांडली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि हेडगेवार स्मृती मंदिर परिसराची पाहणी करून माहिती गोळा करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती, असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात सर्वात मोठी खळबळ उडाली ती टेरर फंडिंगच्या तपशीलामुळे. रईस शेखच्या नागपूर प्रवासासाठी अमेरिकन डॉलरमध्ये व्यवहार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याच्या विमान तिकिटासाठी ‘वर्ल्ड पे’ कार्डचा वापर करण्यात आला होता. इंडिगो एअरलाईन्सच्या तत्कालीन विमानतळ व्यवस्थापक चारू वर्मा यांनी विशेष सत्र न्यायालयात याबाबत साक्ष दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हे कार्ड नेमके कुणाचे होते आणि दहशतवादी कारवायांसाठी निधी कोणी पुरवला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. सरकारच्या मते, रईस हा बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित असून, त्याला संघ मुख्यालयाची रेकी करण्यासाठीच नागपुरात पाठवण्यात आले होते. तपासानुसार, 13 जुलै 2021 रोजी रईस अहमद शेख श्रीनगरहून मुंबईमार्गे नागपुरात आला होता. त्यानंतर दोन दिवस नागपुरात थांबून 15 जुलैला तो दिल्लीमार्गे पुन्हा श्रीनगरला परतला. याच काळात त्याने संघ मुख्यालय आणि हेडगेवार स्मृती मंदिर परिसराची रेकी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांचे त्याच्या हालचालींवर आधीपासून लक्ष होते. सप्टेंबर 2021 मध्ये काश्मीर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर या संपूर्ण कटाचा उलगडा झाला. त्यानंतर दहशतवादविरोधी पथकाने त्याला अटक करून नागपुरात आणले. सध्या तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात असून, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयीन सुनावणीला हजर राहत आहे. रईस अहमद शेख हा जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा परिसरातील खाटी मोहल्ल्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. अत्यंत गरिबीत त्याचे बालपण गेले. आर्थिक अडचणींमुळे तो चुकीच्या मार्गावर वळल्याचे तपासात सांगण्यात आले आहे. एका मित्रामार्फत त्याचा संपर्क पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी आला. त्यानंतर संघटनेचा पाकिस्तानातील हँडलर ओमर याने त्याला पाकव्याप्त काश्मीरमध्ये नेऊन प्रशिक्षण दिल्याचा आरोप आहे. एप्रिल 2021 मध्ये तो दहशतवादी तळावर गेल्याचेही तपासातून समोर आले आहे. संघ मुख्यालयाची माहिती गोळा करण्याचे आदेश दरम्यान, या प्रकरणात नागपुरातील काही स्थानिक व्यक्ती त्याला मदत करणार होत्या, अशी माहितीही तपास यंत्रणांना मिळाली आहे. मात्र, सुरक्षा संस्थांनी वेळेत हालचालींवर लक्ष ठेवल्याने मोठा कट उधळला गेल्याचे मानले जात आहे. रईसने जामिनासाठी अनेक प्रयत्न केले, पण गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने त्याला कोणताही दिलासा दिलेला नाही. सरकारने न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, रईस हा दहशतवादी संघटनेसाठी सक्रियपणे काम करत होता आणि संघ मुख्यालयासारख्या संवेदनशील ठिकाणाची माहिती गोळा करण्याचे त्याला आदेश देण्यात आले होते. या प्रकरणामुळे नागपूरसह देशातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर