ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

‘लाडकी बहीण’च्या e-KYC बाबत संभ्रम?:कागदपत्रे कार्यालयात जमा करण्याचे कोणतेही निर्देश नाहीत, महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजने अंतर्गत ई-केवायसी करू न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासनस्तरावरून देण्यात आलेले नाहीत, असे महिला व बालविकास विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. महिला व बालविकास विभागातर्फे असे कळवण्यात आले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत ई-केवायसी करू न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासनस्तरावरुन देण्यात आलेले नाहीत. याबाबतचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही. तसेच सदर वस्तुस्थिती लक्षात घेता, चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन देखील विभागाकडून करण्यात आले आहे. ई-केवायसीची प्रक्रिया सतत चालूच राहणार- एकनाथ शिंदे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंधेरीत एका कार्यक्रमात बोलताना म्हटले की, लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या लाभामध्ये बाधा आणणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम केले जात आहे. तसेच प्रत्येक पात्र महिलेपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तसेच ई-केवायसीची प्रक्रिया सतत चालूच राहणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. त्यांच्या याच विधानामुळे आता भविष्यात पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे, असे म्हटले जात आहे. चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्यांकडून रक्कम वसूल केली जाणार- अदिती तटकरे मंत्री अदिती तटकरे यांनी देखील एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले की, पात्र लाभार्थी कोणत्याही योजनेपासून वंचित राहू नयेत यासाठी प्रयत्न केले जात आहे. पण चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल केली जाणार आहे. काही पुरुषांनीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडूनही पैसे वसूल करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर