ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

यवतमाळ‎मध्ये अनैतिक संबंधाच्या ‎संशयातून डोके चिरडले:मृतदेहाची ओळख पटली, पोलिसांनी ठोकल्या आरोपीस बेड्या

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अकोला जिल्ह्यातील बोरीगाव मंजू पोलिस‎ ठाण्यात हद्दीत घडलेल्या एका थरारक‎ आणि क्रूर हत्याकांडचा छडा लावण्यात ‎यवतमाळातील अवधुतवाडी पोलिसांना यश ‎आले. अनैतिक संबंधाच्या संशयातून एका 19 वर्षीय तरुणाची दगडाने चेहरा ठेचून‎ निर्घृण हत्या करण्यात आली होती.‎ पोलिसांनी अत्यंत गुप्तता आणि कौशल्याने ‎तपास चक्र फिरवून या प्रकरणातील मुख्य ‎आरोपीला यवतमाळ येथून बेड्या ठोकल्या‎ आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण‎ जिल्ह्यात आणि यवतमाळ परिसरात प्रचंड‎ खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि.22 मे 2026 ‎रोजी बोरीगाव मंजू हद्दीतील बोदरखेड शेत‎ शिवारात असलेल्या सुभाष यादव यांच्या ‎गोदामासमोरील रेल्वे अंडरपासमध्ये एक ‎अनोळखी मृतदेह आढळून आला होता.‎ मृतदेहाच्या अंगात फक्त पॅन्ट होती, तर‎ अंगातील टी-शर्ट गळ्याभोवती गुंडाळलेला‎ होता. अत्यंत क्रूरतेने मृतकाचा चेहरा ‎दगडाने ठेचून त्याची ओळख मिटवण्याचा‎ प्रयत्न करण्यात आला होता. पोलिस‎ निरीक्षक शंकर शेळके यांच्या पथकातील ‎गोपनीय बातमीदाराकडून एक अत्यंत ‎महत्त्वाची माहिती मिळाली. यवतमाळ‎ येथील एक 19 वर्षांचा तरुण दि. 21 मे 2026‎च्या रात्रीपासून बेपत्ता असल्याची माहिती‎समोर आली. अकोला पोलिसांनी तत्काळ‎ यवतमाळ येथील अवधुतवाडी पोलिस ‎ठाण्याशी संपर्क साधला. मिळालेल्या‎ वर्णनावरून आणि तपासाअंती, तो मृतदेह ‎विक्की उर्फ बबलु राजू भेंडे (वय 19 वर्षे,‎रा. गुरुनानक नगर, गोधणी रोड,‎यवतमाळ) याचाच असल्याचे निष्पन्न‎ झाले. मृतकाची ओळख पटल्यानंतर ‎एलसीबीच्या पथकाने विक्की भेंडे याच्या‎ मित्रांकडे आणि परिसरात चौकशी केली.‎ विक्कीचे त्याच्याच गल्लीत राहणारा शेजारी ‎युवराज तांगडे (वय 41 वर्षे) याच्यासोबत‎ काही दिवसांपूर्वी कडाक्याचे भांडण झाले‎होते, अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना‎ मिळाली. संशयाच्या आधारे अकोला‎ पोलिसांनी यवतमाळातील अवधुतवाडी ‎पोलिसांच्या मदतीने युवराज तांगडे याला‎ ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी‎ केली. मृतक विक्की याचे माझ्या पत्नीसोबत‎ अनैतिक संबंध असल्याचा मला संशय ‎होता, याच रागातून मी त्याला गाठून दगडाने ‎चेहरा ठेचून त्याची हत्या केली, अशी ‎धक्कादायक कबुली आरोपी युवराज तांगडे ‎याने दिली. आरोपीला पुढील तपासासाठी ‎बोरीगाव मंजू पोलिसांच्या हवाली करण्यात ‎आले आहे.‎‎‎‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर