ब्रेकिंग न्यूज
⚡ तीन महिने इस्त्रीच्या दुकानात काम, सिग्नल मिळताच गोळीबार, राजेंद्र भिंगे खून प्रकरणात शॉकिंग खुलासा, पंढरपु… ✦ ⚡ तीन महिने इस्त्रीच्या दुकानात काम, सिग्नल मिळताच गोळीबार, राजेंद्र भिंगे खून प्रकरणात शॉकिंग खुलासा, पंढरपु… ✦ ⚡ तो वाघाकडे अन् वाघ त्याच्याकडे पाहतोय, दुचाकीस्वार आणि वाघ समोरासमोर, श्वास रोखून धरायला लावणारा Video ✦ ⚡ Pune News: दीर अन् सासूच निघाले ‘व्हिलन’; आधी पतीचं निधन, आता शिक्षिकेला लेकीच्या वाढदिवसादिवशी संपवलं, पुण… ✦ ⚡ रेल्वेत सावज हेरायची, प्रसाद म्हणून चिक्की द्यायची अन्… महिलेचं कांड पाहून सगळ्यांना धक्का, सोलापुरात मोठ… ✦ ⚡ मारेगाव–यवतमाळ महामार्गावर अज्ञात वाहनाची रोह्याला धडक! ✦ ⚡ घोडदरा शिवारात वाघाचे पगमार्क; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! ✦ ⚡ ‘एचआयव्ही’ग्रस्त असल्यानं पत्नी सोडून गेली; पुण्यात चुलत्यानं अल्पवयीन पुतणीवरच केला अत्याचार, जामीन अर्जाव… ✦ ⚡ IND vs NZ : केएल राहुल 5 रनवर असताना मैदानात मोठा ड्रामा… हेन्रीला कॅप्टनने वेड्यात काढलं, पण पुढच्या 2 म… ✦ ⚡ MPSC गट-क परीक्षेसाठी जम्बो भरती, तुम्ही करताय तयारी? अनुभवी विद्यार्थ्यांनी दिले 5 सिक्रेट टिप्स! Video
SP News Maregaon

तीन महिने इस्त्रीच्या दुकानात काम, सिग्नल मिळताच गोळीबार, राजेंद्र भिंगे खून प्रकरणात शॉकिंग खुलासा, पंढरपु…

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सोलापूर: शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र भिंगे खून प्रकरणाने पंढरपूर हादरलं. या हत्याकांडाचा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आता याप्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. जुन्या वैमनस्यातून आणि माजी नगरसेवक नामदेव भुईटे यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच राजेंद्र भिंगे यांचा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने गोळ्या झाडून खून करण्यात आल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाचा उलगडा केला.

नेमकं घडलं काय?

17 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास राजेंद्र भिंगे जेवणानंतर आपल्या घरासमोर नेहमीप्रमाणे शतपावली करीत होते. त्या वेळी राजेंद्र भिंगे हे एकटेच फिरत असल्याची खात्री झाल्यानंतर मारेकऱ्यांनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या आणि ते घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. राजेंद्र भिंगे यांच्या पत्नी महानंदा भिंगे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

पंढरपुरातील राजेंद्र भिंगे हत्या प्रकरणाला नवं वळण, छातीतून दोन गोळ्या काढल्या; तब्बल 600 कार्यकर्त्यांचा जमाव अन् काय घडलं?

पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि तात्यासाहेब उर्फ प्रवीण शिंदे याला अटक केली. या प्रकरणाची मुळे 17 एप्रिल २०१७ रोजी झालेल्या माजी नगरसेवक नामदेव भुईटे यांच्या खुनाशी जोडलेली असल्याचे स्पष्ट झाले. त्या जुन्या खून प्रकरणात राजेंद्र भिंगे यांना अटक झाली होती. त्याच खुनाचा सूड घेण्यासाठी हा कट रचल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

तीन महिन्यांपासून पाळत

राजेंद्र भिंगे यांच्या हत्येचा हा कट अत्यंत थंड डोक्याने रचण्यात आला होता. गेल्या तीन महिन्यांपासून भिंगे यांच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. हडपसर येथून आलेला शार्प शूटर रोहन नागे तब्बल तीन महिने स्थानिक इस्त्रीच्या दुकानात कामावर राहून योग्य संधीची वाट पाहत होता. मागील पंधरा दिवसांपासून भिंगे यांच्या दैनंदिन हालचालींची माहिती घेतली जात होती. घटनेच्या रात्री ते शतपावलीसाठी बाहेर पडताच पाळत ठेवलेल्या साथीदारांनी शार्प शूटरला सिग्नल दिला आणि ठरल्यानुसार गोळीबार करून सर्वजण पसार झाले.

गुजरातमधून तिघांना अटक

पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शार्प शूटर रोहन नागे, स्वप्नील अहिरे आणि वैभव पसलकर या तिघांना राजस्थानकडे पळून जाताना गुजरातमधील अहमदाबाद येथून ताब्यात घेतले, तर अनिकेत गवळी याला पंढरपूरमधून अटक केली. अटक केलेल्या सर्व आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास पंढरपूर शहर पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर